मुख्याध्यापक संघ कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्याध्यापक संघ कार्यक्रम
मुख्याध्यापक संघ कार्यक्रम

मुख्याध्यापक संघ कार्यक्रम

sakal_logo
By

विद्यार्थ्यांत शिकण्याची उर्मी तयार करा
लक्ष्मण पच्छापुरे ; मुख्याध्यापक संघातर्फे पारितोषिक वितरण

गडहिंग्लज, ता. २० ः विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची ऊर्मी कमी होत आहे. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांत ऊर्मी तयार करण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षणाधिकारी लक्ष्मण पाच्छापुरे यांनी केले.
तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे आयोजित पारितोषिक वितरण व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. संघाचे माजी अध्यक्ष बी. जी. काटे अध्यक्षस्थानी होते. जि. प. उपशिक्षणाधिकारी भीमराव टोणपे, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, के. बी. पोवार, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही. जी. पोवार, कोजिमाशिचे अध्यक्ष डी. एस. घुगरे, आर. वाय. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. माध्यमिक पतसंस्थेच्या सभागृहात कार्यक्रम झाला.
श्री. पाच्छापुरे म्हणाले, ‘विद्यार्थी व शिक्षक एकरूप होऊन अध्ययन व अध्यापन होत असते ती शाळा आदर्श असते. गडहिंग्लज, आजरा आणि चंदगडमध्ये गुणवंतांची खाण आहे. शिक्षकांनी रत्नपारखी होऊन त्यांना शोधावे.’
गुरूवर्य बी. जी. काटे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जोमाकांत पाटील (गडहिंग्लज) यांच्यासह ५ वी, ८ वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी, मराठी हस्ताक्षर व निबंध स्पर्धेतील विजेते, शंभर टक्के निकालाच्या शाळा, स्वच्छ सुंदर आदर्श शाळांचा श्री. पाच्छापुरे यांच्या हस्ते सत्कार झाला. टोणपे, पोवार, हालबागोळ, घुगरे, पाटील, काटे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. तालुकाध्यक्ष राजेंद्र खोराटे यांनी स्वागत तर सचिव जयसिंग पाटील यांनी प्रास्ताविक केले. रशिदा शेख यांनी सूत्रसंचालन, रमेश देसाई यांनी आभार मानले.