समन्वय ठेवून कोल्हापूरचा विकास करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समन्वय ठेवून कोल्हापूरचा विकास करा
समन्वय ठेवून कोल्हापूरचा विकास करा

समन्वय ठेवून कोल्हापूरचा विकास करा

sakal_logo
By

फोटो 77006
...


समन्वय ठेवून कोल्हापूरचा विकास करा

ज्योतिरादित्य शिंदेः केंद्रीय योजना प्रभावीपणे राबविण्याच्या लोकप्रतिनिधी, प्रशासनाला सूचना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २० ः केंद्र शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या सर्व योजनांची कोल्हापूर जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वय ठेवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा. थेट पाईपलाईनसह शहरातील ड्रेनेज लाईन, पंचगंगा नदी शुद्धीकरण आणि इतर केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा कृती आराखडा तातडीने सादर करा, अशी सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज येथे केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केंद्रीय योजनांच्या प्रगतीचा आढावा बैठकीत मंत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण अंतर्गत एकही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे. घरकुलाची अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करा. घरकुलाचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनाने त्यांना प्रोत्साहित करावे, अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी अमृत योजना, थेट पाणीपुरवठा योजना, पीएम किसान, पीएम स्वनिधी, मातृवंदना या केंद्रीय योजनांबरोबरच पंचगंगा शुद्धीकरण या अनुषंगाने सूचना मांडल्या.
यावेळी विविध विभागाच्या अधिकारी, प्रतिनिधींनी केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत तसेच सद्यस्थितीबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सत्यजित कदम, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.
....

पर्यटन विकासाला अधिक प्राधान्य

अमृत योजना टप्पा एक व दोन, लाभार्थी विकास कार्यक्रम, अमृत सरोवर योजना, पंचगंगा शुद्धीकर योजना, कोल्हापूर जिल्ह्याची महत्त्‍वाची वैशिष्ट्ये जसे कोल्हापुरी चप्पल, गूळ उत्पादन, चांदीचे दागिने तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा पर्यटन विकास या बाबींना पुढील काळात अधिक प्राधान्य देऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मंत्री शिंदे यांनी दिली.