
अंबपवाडीचा ‘नंदकुमार’
76989
अंबपवाडीचा ‘नंदकुमार’
केंद्राच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये
कोल्हापूर : अंबपवाडी (ता. हातकणंगले) येथील नंदकुमार बाबासाहेब खोत केंद्र सरकारच्या सिक्युरिटी प्रेसच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. हैदराबाद येथील युनिटमध्ये प्रिंटिंग टेक्निशियन म्हणून त्याची नियुक्ती झाली.
नंदकुमार हा शेतकरी कुटुंबातील, चौथीपर्यंतचे शिक्षण शेतात काम करून त्यांने गावात तर दहावीपर्यंत अंबप हायस्कूलला शिक्षण घेतले. घरची परिस्थिती नाजूक होती, तरीही शिक्षणाशिवाय आपल्यासमोर पर्याय नसल्याने त्याने नेटाने अभ्यास केला. अकरावी, बारावी पाराशर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्ण केल्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन बीड येथे ‘इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ शिक्षण घेतले, त्यानंतर नवी मुंबई येथे प्रिंटिंग अँड पॅकिंग टेक्नॉलॉजी या शाखेत पदवीचे शिक्षण घेतले. पदवी घेतल्यानंतर त्याने केंद्र सरकारची परीक्षा दिली आणि त्याची हैदराबाद येथे प्रिंटिंग टेक्निशियन म्हणून नियुक्ती झाली. घरची परिस्थती नाजूक होती, वडिलांचे छत्र हरपले होते, तरीही आईने मला जिद्दीने शिकवले, तिच्यामुळेच आज या पदापर्यंत पोहोचू शकल्याचे नंदकुमारने सांगितले.