खून -चौघे अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खून -चौघे अटक
खून -चौघे अटक

खून -चौघे अटक

sakal_logo
By

76988
.....
आर्थिक देवघेवीतूनच ऋषीकेशचा खून

रेकॉर्डवरील चौघा गुन्हेगारांना अटक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २० : रेकॉर्डवरील चौघा गुन्हेगारांकडून आर्थिक देवघेवीतून ऋषीकेश सूर्यवंशीचा खून झाला आहे. या प्रकरणी चौघांना अटक केल्याची माहिती करवीर पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गणेश लिंगाप्पा यलगट्टी (वय २०, अमृतनगर, गिरगाव रोड, पाचगाव), अथर्व संजय हावळ (२० रा. गंगावेस, कुंभार गल्ली, शाहू उद्यानमागे), ऋषभ विजय साळोखे (२१, हरिमंदिराच्या मागे, रामानंदनगर) आणि सोहम संजय शेळके (२०, स्वाती विहार अपार्टमेंट, गजानन महाराज नगर, मंगळवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. चौघांनाही उद्या न्यायालयात हजर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाचगाव रोडवरील जगतापनगर परिसरात काल ऋषीकेश महादेव सूर्यवंशी (वय २४, रा. पाचवा बसस्टॉप, फुलेवाडी, मूळ गणेशनगर, शिंगणापूर) याचा खून झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवरील सीडीआरनुसार संशयित चौघे आरोपी त्या रात्री ऋषीकेशच्या संपर्कात असल्याची माहिती मिळविली. त्यानुसार ऋषभ आणि सोहम यांना नाळे कॉलनी येथून करवीर पोलिसांनी अटक केल्याची माहिती निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली. तसेच गणेश आणि अथर्वला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
अधिक माहिती देताना सिंदकर म्हणाले, ‘‘खुनाच्या रात्री गणेश, अथर्व आणि मयत ऋषीकेश तिघे एकाच मोटारसायकलीवरून जगताप नगरात पोचले होते. गणेशने ऋषीकेशच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला तर तत्पूर्वी वृषभने त्याच्यावर चाकूने वार केले आहेत. ते सर्वजण दारू पिण्यासाठी जगताप नगराच्या नाल्याजवळ बसले होते. तेथे पूर्वीच्या आर्थिक देवघेवीचा विषय निघाल्यानंतर वाद आणि झटापट झाली. त्यानंतर खून झाला.
ऋषीकेशची आई माधवी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत डिसेंबरमध्ये झालेल्या मारामारीचा संदर्भ घेऊन दोघांवर संशय व्यक्त केला होता. त्यांची नावेही दिली होती. मात्र सध्यातरी त्यांचा या खुनात संबंध नसल्याचे सिंदकर यांनी सांगितले. तसेच खुनातील दुचाकीसह अन्य माहिती घेण्याचे काम सुरू आहे. आर्थिक देवघेवीतून हा खून झाल्याची कबुली संशयितांनी दिली असली तरीही यामागे अन्य सुत्रधार कोण आहे काय याचा तपास सुरू असल्याचेही सिंदकर यांनी स्पष्ट केले.
-------

आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान, खुनाचा तपास पोलिस करीत असतानाच काल सायंकाळी एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. त्यानुसार ती संबंधित संशयित आरोपीची जवळची नातेवाईक असल्याचे दिसून आले आहे. त्या महिलेवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. खुनाचा तपास सुरू असताना हा प्रयत्न झाला आहे काय? याचा तपास पोलिस करीत आहेत.
------------

ओपन बारबाबत स्थानिकांच्या तक्रारी

घटनास्थळी गांजाही मिळाला असल्याचे पोलिस निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले. जगतापनगर परिसरात अनेक वेळा गांजाची पार्टी होते. ओपन बार म्हणून हा परिसर परिचित आहे. काही स्थानिकांनी याबाबत तोंडी तक्रारी केल्या आहेत. तरीही कारवाई होत नसल्याचे पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून दिल्यानंतर अशी कोणतीही तक्रार पोलिस ठाण्यात आली नसल्याचे सिंदकर यांनी सांगितले. तक्रार आल्यास तातडीने पोलिस पाठविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
-----------