आजरा ः गंगामाई वाचन मंदिर व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः गंगामाई वाचन मंदिर व्याख्यान
आजरा ः गंगामाई वाचन मंदिर व्याख्यान

आजरा ः गंगामाई वाचन मंदिर व्याख्यान

sakal_logo
By

ajr२०४.jpg.....
्77001
आजरा ः येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातील व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना आप्पासाहेब खोत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तंत्रज्ञान अतिरेकाने घराचे घरपण हरवतेय
आप्पासाहेब खोत; श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर व्याख्यानमाला

आजरा, ता. २० ः मोबाईल, टीव्हीवरील मालिकांचा अतिरेक वाढत चालला आहे. कुटुंबातील सदस्य सोशल मीडियाच्या मोहात पडून तंत्रज्ञानाच्या विळख्यात अडकत आहेत. त्यामुळे घराचे घरपण हरवत आहे, अशी खंत साहित्यिक व कथाकथनकार आप्पासाहेब खोत यांनी व्यक्त केली.
येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात श्री. खोत यांनी तिसरे पुष्प गुंफले. या वेळी त्यांनी गॅदरिंगचा पाहुणा व महापूर या दोन कथांवर त्यांनी कथाकथन केले. वाचनालयाचे अध्यक्ष डाॅ. अशोक बाचुळकर अध्यक्षस्थानी होते. डाॅ. बाचुळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गॅदरिंगचा पाहुणा या कथेने श्रोत्यांना मनमुराद हसवले. तर महापूर कथेने डोळ्यांत अश्रू उभे केले. यावेळी त्यांनी संस्कारशील बनण्याचा संदेश दिला.
महापूर कथेने श्रोत्यांच्या काळजाला हात घातला. सध्याच्या काळात नात्याची वीण कशी सैल होत आहे, हे कथेतून मांडण्याचा प्रयत्न खोत यांनी केला. नातं मग ते माणुसकीचे असो वा रक्ताचं. अडचणीतही नाती किती कोरडी होतात, हे या कथेतून मांडण्यात आले. कोसळणारा पाऊस, विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याचा बोचरा वारा याचे वर्णन करत खोत यांनी अक्षरक्षः प्रसंग जिवंत केला तर आठवडाभर कोसळणाऱ्या पावसात पोटच्या तीन चिमुकल्यांना घेऊन जगण्याची लढाई लढणारी स्वाभिमानी हिरा आणि अडचणीच्या प्रसंगातही बहिणीला मदत करण्यात हतबल भाऊ नायकू व नात्यांना तिलांजली वाहणारी नायकूची पत्नी, हिराची सर्जा आणि सखी ही दोन लहानगी मुलं या सर्व पात्रांची भूमिका खोत यांनी तंतोतंत उभी केली. महापुरात हिराच्या आयुष्याची झालेली दैना खोतांनी खास शैलीतून मांडली. त्यामुळे श्रोते गलबलून गेले. उपाध्यक्षा गीता पोतदार यांनी आभार मानले.