टु ४ गड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु ४ गड
टु ४ गड

टु ४ गड

sakal_logo
By

gad209.jpg
77013
गडहिंग्लज : स्थानिक स्त्री रंगकर्मींनी सादर केलेल्या एस आय ब्लीड नाटकातील क्षण.
-------------------------------------------------------
‘एस आय ब्लीड’ नाटकास
गडहिंग्लजला रसिकांचा प्रतिसाद

गडहिंग्लज, ता. २० : गडहिंग्लज नाट्य महोत्सवात दुसऱ्या दिवशी एस आय ब्लीड नाटकाचे सादरीकरण झाले. नागेश चौगुले, संतोष चिकोडे, संजय संकपाळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्थानिक स्त्री रंगकर्मींच्या या नाटकास गडहिंग्लजकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
युवराज पाटील लिखित नाटकाचे दिग्दर्शन शिवाजी पाटील यांनी केले आहे. गडहिंग्लजच्या स्थानिक स्त्री रंगकर्मींनी प्रभावीपणे नाटक सादर केले. विशेषतः नाटकातील बालकलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. मुलगा-मुलगीचे भेदक चटके तिला आजही बसतात. मासिक पाळी आणि स्त्रीच्या आयुष्यातील बदल याकडे चुकीच्या मनोवृत्तीने पाहिले जाते. स्त्रियांचं जग उलगडणारं एस आय ब्लीड हे नाटक मासिक पाळी ते लिंगभेदापर्यंत बिनधास्तपणे चर्चा करत प्रेक्षकांना विचार करायला लावते. याबाबत समज-गैरसमजाचे मंथन घडवणारा नेटका प्रयोग गडहिंग्लज कला अकादमीच्या स्थानिक स्त्री कलाकारांनी सादर केला. किरण (अर्णवी उपराटे) विशाखा (शिवानी डोमने) आणि कमल आजी (उर्मिला कदम) यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांना रितू, मालती आणि बालकलाकारांनी उत्तम साथ दिली. निलेश शेळके यांचं संगीत आणि कपिल मुळे यांची प्रकाश योजनाची उत्तम पद्धतीने साथ मिळाल्याने या नाटकाने उपस्थित प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.