Mon, Jan 30, 2023

पन्हाळा निबंध स्पर्धा
पन्हाळा निबंध स्पर्धा
Published on : 25 January 2023, 12:10 pm
निकमवाडी विद्यामंदिरतर्फे पन्हाळा सहल
कोल्हापूर : निकमवाडी विद्यामंदिरतर्फे आपल्याजवळील वास्तूचे महत्त्व समजावून घेण्याच्या उद्देशाने पन्हाळा येथे सहलीचे आयोजन केले. ओंकार वेल्फेअर फाउंडेशन, इतिहास अभ्यासक मानसिंग चव्हाण यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी महादोबच्या डबरा येथे मारुतीचे दर्शन घेतले. चव्हाण यांनी पन्हाळाचे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, भौतिक महत्त्व सांगितले. खंदक, तटबंदी, बुरुज, ओवऱ्या यांची माहिती दिली. विविध शिलालेखांचा अर्थ, शिवाजी राजेंपासून ते शाहू राजेपर्यंतचा पन्हाळ्या संदर्भात इतिहास सांगितला. पहिली ते सातवीतील विद्यार्थी उपस्थित होते. फाउंडेशनतर्फे ‘मी पाहिलेला पन्हाळा’ ही निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.