Wed, Feb 1, 2023

साळगावच्या विद्यार्थांकडून निसर्ग निरीक्षण
साळगावच्या विद्यार्थांकडून निसर्ग निरीक्षण
Published on : 22 January 2023, 1:17 am
साळगावच्या विद्यार्थ्यांकडून निसर्ग निरीक्षण
आजरा ः साळगाव (ता. आजरा) येथील शाळेत वनभोजनाचा उपक्रम झाला. या उपक्रमात शालेय विद्यार्थी उत्साहात व आनंदाने सहभागी झाले होते. याबाबत शालेय मंत्रिमंडळ व शिक्षकांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. मुला-मुलींचे स्वतंत्र गट करून जंगलातून निसर्गाचे निरीक्षण, पक्षांचे आवाज याची माहिती घेतली. विद्यार्थी झाडावर चढणे-उतरणे या खेळात रंगून गेले. मुख्याध्यापिका मंजिरी यमगेकर, गीता जंगम, संजय मोहिते, निवृती मिटके, सत्यवान सोन्ने, शालेय पोषण आहार ठेकेदार यांनी विशेष परिश्रम घेतले. शामराव कुंभार यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.