भादवण मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भादवण मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न करा
भादवण मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न करा

भादवण मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न करा

sakal_logo
By

ajr209.jpg

भादवण (ता. आजरा) ः येथील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आमदार प्रकाश आबिटकर यांनी सत्कार केला. यावेळी संजय पाटील आदी उपस्थित होते.
---------------------

भादवण मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न करा
प्रकाश आबिटकर; पदाधिकाऱ्यांचा सत्कार, योजनांच्या अभ्यासाचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
भादवण, ता. २३ ः विकासकामांच्या माध्यमातून भादवण गावाला मॉडेल बनवावे. याचा आदर्श अन्य गावांसमोर ठेवावा. त्यासाठी लागेल ते सहकार्य केले जाईल. साहजिकच विकासकामांसाठी कायम पाठीशी राहू, असे आश्वासन राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले.
भादवण (ता. आजरा) येथील भादवण हायस्कूलमध्ये युवा शेतकरी विकास पॅनेलतर्फे विजयी मेळावा झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना त्यांनी वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करा, असा सल्ला दिला. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुन आबिटकर, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, भादवणचे माजी सरपंच व पॅनेलप्रमुख संजय पाटील, दत्तात्रय जाधव, भिवाजी गोईलकर, सुभाष  देवरकर, विश्वजित  डोंगरे, दत्तात्रय पाटील, कल्याण निकम, अनिल डोंगरे, तसेच राजेद्र सावंत उपस्थित होते.
यावेळी सरपंच माधुरी गाडे व ग्रामपंचायतीचे नूतन पदाधिकारी यांचा सत्कार झाला. सविता जाधव (हाजगोळी बुद्रूक), सुषमा पाटील (कानोली), धनंजय जाधव (हाजगोळी खुर्द), के. बी. कुंभार (निंगुडगे), शिवाजी पाटील (कोरिवडे), धनंजय पाटील (साळगाव), बापू निउगरे (मडीलगे), संदीप चौगले (सिरसंगी) या सरपंचांचाही आबिटकर यांच्या हस्ते सत्कार झाला. संजय पाटील म्हणाले, ‘जनतेला दिलेले वचन पाळल्यामुळे विजय मिळवता आला. विरोधाला विरोध न करता गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करूया.’ सरपंच माधुरी गाडे यांचे भाषण झाले. दयानंद पाटील यांनी स्वागत करून सूत्रसंचालन केले. प्रा. रणजित गाडे यांनी प्रास्ताविक केले. पी. के. केसरकर यांनी आभार मानले.