आवश्यक- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- संक्षिप्त
आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

sakal_logo
By

सुमंगलम महोत्सवात
सहभागी व्हा ः सतेज पाटील
कोल्हापूर ः कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभौतिक लोकोत्सवात पर्यावरणविषयक मंथन होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरचीही जगभर नव्याने ओळख होईल. या महोत्सवात जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. गोकुळ दूध प्रकल्पाच्या बैठकीवेळी ते बोलत होते. या वेळी महोत्सव कोअर कमिटीचे सदस्य माणिक पाटील-चुयेकर यांनी २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. ‘गोकुळ''सह विविध सहकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांतर्फे या सोहळ्याला सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही सतेज पाटील यांनी दिली. या वेळी आमदार राजेश पाटील, ‘गोकुळ''चे अध्यक्ष विश्वास पाटील, सर्व संचालक, कणेरी मठाचे पी. एस. जाधव, जी. के. शिंदे, योगेश साळोखे आदी उपस्थित होते.
-
77079
गवळी, सूर्यवंशी यांचे सत्कार
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेले अधीक्षक रमेश गवळी आणि सहायक अधीक्षक किशोर सूर्यवंशी यांचा सामाजिक कार्य ग्रुपतर्फे सत्कार झाला. कोरोना काळात स्वतःचे संसार बाजूला ठेवून प्रामाणिकपणे मृत झालेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ऋषीकेश गवळी यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम झाला. सूर्यवंशी, राजू मांडवकर, अजित देशपांडे, किरण व्हणगुते, सुरेश चव्हाण, राजू थोरावडे, सुभाष कोडलीवर, सुरेश माने, नंदकुमार कोठावळे, मनोज थोरावडे, विजय ढवळे, सतीश दिवटे, जितू पाटील, अनिल माळकर, बाळकृष्ण गवळी, अविनाश पाटील, महादेव भालकर, विशाल उत्तुरे, भरत वास्कर आदी उपस्थित होते. महेश शिर्के यांनी आभार मानले.
............