
पाणीपुरवठा विस्कळित
शहराच्या काही भागात
पाणीपुरवठा विस्कळीत
नागरिकांच्या तक्रारी : पाणीपुरवठ्यातील विघ्ने संपेनात
कोल्हापूर, ता. २१ : शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्ने काही संपेना झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले असतानाच आज शहराच्या बहुतांशी भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. काही भागात अपुरा पाणीपुरवठा तर काही ठिकाणी पाणीच न आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
शिंगणापूर योजनेतून शहराच्या बहुंताशी भागात पाणीपुरवठा होता. या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी तीन पंप आहेत. यापैकी एक पंप काही दिवसांपूर्वी बंद होता. आजही एक पंप बंद झाल्याची चर्चा होती. तथापि, जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी सर्व पंप सुरू असल्याचे सांगितले. पण शहरातील पश्चिम भागातील अनेक प्रभागांत मात्र आज अपुरा व अनियमित पाणीपुरवठा सुरू होता. काही प्रभागात आज पाणीच आले नाही तर काही ठिकाणी पाण्याच्या नियमित वेळेपेक्षा उशिरा पाणीपुरवठा झाला. झालेला पाणीपुरवठाही कमी दाबाने झाल्याच्या तक्रारी आहेत.
........