सं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सं
सं

सं

sakal_logo
By

अंबाबाई मंदिरात गणेश जयंतीचे आयोजन
कोल्हापूर : श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळ संस्थेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता. २५) गणेश जयंती सोहळ्यानिमित्त मान्यवरांचा गौरव सोहळा समारंभ होत आहे. श्रीमत जगद्‌गुरु शंकराचार्य महाराज करवीर मठ यांच्या हस्ते श्री अंबाबाई मंदिरात सायंकाळी सात वाजता कार्यक्रम होईल. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे अध्यक्षस्थानी असतील. मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे प्रमुख उपस्थित राहतील. प्रा. मानसी दिवेकर यांच्या हस्ते स्वागत होईल. ‘स्वयंसिध्दा’च्या अध्यक्षा श्रीमती कांचनताई परुळेकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. मोहन पाटील, श्री महालक्ष्मी धर्मशाळेचे ज्येष्ठ संचालक एस. के. कुलकर्णी, विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या व्यक्तिंचा सत्कार आयोजित केला आहे. गुरुदेव रविशंकर आर्ट गॅलरीच्या प्राचार्या देवीश्री वैभवी यांचे ‘गणेश महात्म्य’ यावर प्रवचन होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे अध्यक्ष नंदकुमार मराठे, खजानीस रजनीकांत गुरगुटे, कार्यवाह किरण धर्माधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
-----------
कमला कॉलेजमध्ये खांडेकर यांचा जन्मदिन
कोल्हापूर : कमला कॉलेजमधील मराठी विभागामार्फत मराठी भाषा पंधरावड्यानिमित्त वि. स. खांडेकर यांचा जन्मदिन साहित्यिक उपक्रमांनी साजरा झाला. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. सुजय पाटील यांनी ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या मराठी भाषेतील योगदानाची माहिती दिली. त्यानंतर मराठी काव्यवाचन मैफल रंगली. रेणू मगदूम, आदिती काटे, सिध्दी नागवेकर, सायली यादव, प्रेरणा गोंधळी या विद्यार्थिनींनी काव्य वाचन केले. सर्व प्राध्यापक,विद्यार्थिनी उपस्थित होते.