डीकेटीई ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीकेटीई ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन
डीकेटीई ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन

डीकेटीई ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन

sakal_logo
By

05437
इचलकरंजी : डीकेटीई ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
--------
डीकेटीई ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन
इचलकरंजी : डीकेटीई ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते. विद्यार्थिदशेत मुलांचे वर्तन कसे असावे, याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे होत्या. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्याहस्ते केला. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक व अहवाल वाचन केले. प्राचार्या श्रीमती व्ही. एच. उपाध्ये, उपप्राचार्य ए. बी. पाटील, समुपदेशक डॉ. सौ. मनीषा शेट्टी आदी उपस्थित होते.
---
05438
इचलकरंजी : एसटी आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलताना अभिजित पाटील.
इंधन बचत मासिक कार्यक्रम
इचलकरंजी : येथील एसटी आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. शहापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिजित पाटील यांच्याहस्ते उद्‍घाटन केले. इंधन बचतीचे महत्त्व व त्यासंबंधी व्यापक जनजागृती करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत आगारामध्ये इंधन बचत मासिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे, असे आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी सांगितले. आगारातील चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. स्वप्निल गोंधळी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सहायक कार्यशाळा अधिक्षक सुहास चव्हाण यांनी आभार मानले.