गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

77295
गडहिंग्लज : शिवराज फार्मसी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना प्रा. किसनराव कुराडे. व्यासपीठावर डॉ. राहुल जाधव व इतर.

शिवराज फार्मसीमध्ये स्पंदन कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील शिवराज फार्मसी महाविद्यालयात स्पंदन २ के २३ हा कार्यक्रम उत्साहात झाला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे अध्यक्षस्थानी होते. सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी स्वागत केले. प्रा. कुराडे, डॉ. कुराडे, अॅड. कुराडे, प्रा. एम. के. नोरेंज यांची भाषणे झाली. प्रा. महेंद्र जाधव, आर. एच. पाटील यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. वैष्णवी पाडले यांनी सूत्रसंचालन केले. श्रावणी कुंभार यांनी आभार मानले.
-----------------
सिंबायोसिसचा १०० टक्के निकाल
गडहिंग्लज : हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील सिंबायोसिस स्कूलचा चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. इलिमेंटरी परीक्षेत पाच विद्यार्थी ए ग्रेड, १६ विद्यार्थी बी ग्रेड, तर २५ विद्यार्थी सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले. तसेच इंटरमिजिएट परीक्षेत एक विद्यार्थी ए ग्रेड, सात विद्यार्थी बी ग्रेड, तर २१ विद्यार्थी सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले. त्यांना व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. सतीश घाळी, मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर, कलाशिक्षक राजेंद्र शेलार यांचे मार्गदर्शन मिळाले.
-----------------
दैव समाजातर्फे सत्कार
गडहिंग्लज : येथील दैव समाजातर्फे संदीप रिंगणे व सदाशिव रिंगणे यांचा सत्कार केला. संदीप रिंगणे यांची अर्बन बँकेच्या संचालकपदी, तर सदाशिव रिंगणे यांची व्यापारी नागरी पतसंस्थेच्या संचालकपदी नुकतीच निवड झाली आहे. त्याबद्दल हे सत्कार झाले. या वेळी रवळनाथ हौसिंग सोसायटीच्या मीना रिंगणे, माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, बस्ताडे, भीमराव फुंडे, माने आदी उपस्थित होते.
-----------------
७७२९६
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयातर्फे डॉ. सुधीर मुंज यांचा सत्कार करताना डॉ. अनिल कुराडे. शेजारी डॉ. एस. एम. कदम, अॅड. दिग्विजय कुराडे आदी.

‘शिवराज’तर्फे सुधीर मुंज यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयातर्फे पदव्युत्तर विभागप्रमुख डॉ. सुधीर मुंज यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते हा सत्कार झाला. महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन आकर्षक स्तंभ उभारले आहेत. यावर शिल्पकार विशाल राजेश यांच्या कलेतून कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचे शिल्प लावण्यात आले आहे. त्यासाठी डॉ. सुधीर मुंज यांनी आपला एक महिन्याचा अर्धा पगार देऊन संस्थेशी आणि महाविद्यालयाशी ऋणानुबंध जपला आहे. याबद्दल हा सत्कार केला. शिल्पकार विशाल राजेश यांचाही सत्कार झाला. डॉ. कुराडे यांचे भाषण झाले. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, नॅकचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, प्रा. एम. के. नोरेंज, पर्यवेक्षक तानाजी चौगुले, जनसंपर्क अधिकारी प्रा. विक्रम शिंदे उपस्थित होते.