डांबरी प्रकल्पासाठी प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डांबरी प्रकल्पासाठी प्रस्ताव
डांबरी प्रकल्पासाठी प्रस्ताव

डांबरी प्रकल्पासाठी प्रस्ताव

sakal_logo
By

डांबरी प्रकल्पाचा प्रस्ताव
आता निर्णयाच्या टप्प्यात

कोल्हापूर, ता. २२ ः महापालिकेचा कसबा बावडा येथील जुना डांबरी प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव आता अंतिम निर्णयासाठी ठेवला आहे. नोव्हेंबरपासून प्रकल्पाची चर्चा सुरू असून, आता निर्णय झाल्यास पावसाळ्यापूर्वी चार महिन्यांत तरी तो कार्यान्वित होणार का? हा प्रश्‍न आहे.
कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाजवळ असलेला डांबरी प्रकल्प कालांतराने कचऱ्याखाली बुजला होता. शहरातील रस्ते खराब झाले आहेत, पॅचवर्कसाठीही टेंडर काढावे लागत आहे. याबाबत शहरवासीयांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्यानंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी उपायुक्त रविकांत आडसूळ व उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांना नोव्हेंबरमध्ये अहवाल देण्यास सांगितले होते. तेव्हापासून याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. कचरा साफ केल्यानंतर त्याखाली गेलेला प्रकल्प स्थलांतरित करून सुरू करण्याबाबतची चर्चा झाली. त्यावेळी प्रकल्प हलवायचा आहे तर जुना बसवला तर त्याचे आर्युमान कमी असेल व खर्चही मोठा होणार होता. त्याऐवजी नवीनच बसवला तर किमान पुढील किमान दहा वर्षे तरी त्यातून चांगले काम होईल असा विचार आला. यानंतर कोणता निर्णय योग्य होईल याबाबतचा प्रस्ताव देण्यास प्रशासकांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दोनच दिवसांपूर्वी प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर निर्णय अपेक्षित आहे.
उपसमितीमध्ये ठराव झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. निर्णय होण्यासाठी इतका वेळ गेला असून, त्यानंतर तो बसवण्यासाठी टेंडर काढून त्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान महिना उलटून जाईल. त्यानंतर तो बसवून प्रत्यक्ष काम सुरू होण्यास किती कालावधी लागणार हे अनिश्‍चित आहे.