पत्रलेखनातून समतावादी विचारांची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रलेखनातून समतावादी विचारांची गरज
पत्रलेखनातून समतावादी विचारांची गरज

पत्रलेखनातून समतावादी विचारांची गरज

sakal_logo
By

ich231.jpg
77614
इचलकरंजी ः वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या रौप्य महोत्सवी मेळाव्यात पुरस्कारप्राप्त पत्रलेखकांसह डॉ. श्रीपाल सबनीस, प्रसाद कुलकर्णी, पांडुरंग पिसे आदी उपस्थित होते.

पत्रलेखनातून समतावादी विचारांची गरज
श्रीपाल सबनीस ः वृतपत्र पत्रलेखक संघाचा रौप्यमहोत्सवी मेळावा उत्साहात

इचलकरंजी, ता. २३ ः धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रस्थापित करणे आणि तसा समाज उभारण्याच्या दृष्टीने लेखणी कार्यरत ठेवणे हे वृत्तपत्र पत्रलेखकांचे कर्तव्य आहे. स्थानिक प्रश्नापासून आंतरराष्ट्रीय प्रश्नापर्यंतचे व्यापक समतावादी विचार पत्रलेखनातून रूजवण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
इचलकरंजी वृत्तपत्र लेखक संघाचा रौप्यमहोत्सवी मेळावा, ‘लोकजागर’ स्मरणिका प्रकाशन आणि आचार्य शांताराम बापू गरुड पत्र लेखन पुरस्कार वितरण अशा संयुक्त समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रा. डॉ. सबनीस म्हणाले, ‘आज काळाने निर्माण केलेल्या आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करायचा असेल तर आपण आपल्या सर्व जाती धर्मातील संत परंपरेचा व विचारवंतांचा मागोवा घेऊन वाटचाल केली पाहिजे. भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान समाजापुढे पुन्हा पुन्हा मांडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. भांडवलशाही व धर्मांधतेने निर्माण केलेली आव्हाने आज जगभर माणसाला माणसापासून दूर करत आहे. अशावेळी माणूसपण जपण्याची आणि माणूस जोडण्याची जबाबदारी पत्रलेखकांची आहे.’
वर्षभरातील प्रति महिन्याच्या एकूण बारा उत्कृष्ट वृत्तपत्र पत्रलेखकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवले. संस्थेच्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीत महत्वाची कामगिरी केलेल्या शितल बुरसे, विनोद जाधव, सचिन कांबळे, बाळासाहेब नरशेट्टी, गुणवंत चौगुले, दीपक पंडित, गुरुनाथ म्हातगडे, अभिजीत पटवा, दिगंबर उकिरडे, महादेव मिणची, महेंद्र जाधव, संजय भस्मे ,रमेश सुतार, नारायण गुरबे, पंडित कोंडेकर, मनोहर जोशी, पांडुरंग पिसे, प्रसाद कुलकर्णी आदींचा सन्मान केला.
अध्यक्ष पिसे यांनी प्रस्ताविक केले. प्रसाद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अभिजित पटवा यांनी सूत्रसंचालन केले. आभार मनोहर जोशी यांनी मानले. मेळाव्यास कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बेळगाव आदी जिल्ह्यातील वृत्तपत्र पत्रलेखक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.