संकटावर अनुभव, प्रयत्नांनी मात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकटावर अनुभव, प्रयत्नांनी मात करा
संकटावर अनुभव, प्रयत्नांनी मात करा

संकटावर अनुभव, प्रयत्नांनी मात करा

sakal_logo
By

ich232.jpg
77638
तारदाळ : महादेव मंदिर येथे आयोजित महिला मेळाव्याप्रसंगी आशाताई गिनगीणे यांचा सत्कार लक्ष्मी पोवार, अनिता पोवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

संकटावर अनुभव, प्रयत्नांनी मात करा
आशाताई गिनगिणे; तारदाळमध्ये जीवन विद्या मिशनतर्फे हळदी-कंकू
तारदाळ, ता. २३ : मानवी जीवनात आपण जसा विचार करतो तसे आपले आयुष्य घडत असते. त्यामुळे आपण प्रत्येक विचार हा पॉझिटिव्ह असा केला पाहिजे. कारण माणसाचे मन जसे विचार करते तशाच क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. म्हणूनच जीवनात कितीही वेळा संकट येऊदे, त्या संकटावर अनुभव आणि प्रयत्नांनी मात करत एक यशस्वी व सांस्कृतिक, पारंपरिक व वैचारिक आयुष्य घडवावं, असे मार्गदर्शन जीवन विद्या मिशनच्या आशाताई गिनगिणे यांनी केले.
तारदाळ येथे जीवन विद्या मिशन शाखा, जांभळी उपकेंद्र तारदाळतर्फे महादेव मंदिर येथे महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पल्लवी रणजीत पोवार होत्या.
अंजना शिंदे, उपसरपंच दीपाली कोराणे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा दाते, विमल पोवार, राणी माने, पूनम जाधव, लक्ष्मी चौगुले, राणी शिंदे, संगीता पाटील, मालूबाई चौगुले यांच्यासह महिला उपस्थित होत्या. महिलांसाठी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये प्रथम वर्षा कवठेकर, द्वितीय पूजा कावणेकर, तृतीय शीतल सुतार यांना अनुक्रमे पैठणी, चांदीची जोडवी, चांदीचा बिचवा बक्षीस देण्यात आले. सूत्रसंचालन अनिता पोवार, कल्पना चौगुले, अनुराधा चौगुले, अश्विनी चौगुले, सुनील चौगुले यांनी केले. आभार सुमन किल्लेदार यांनी मानले.