महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा
महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा

महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा

sakal_logo
By

ich236.jpg
77643
इचलकरंजी : ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा
---
प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे; इचलकरंजीत आम आदमी पक्षाचा मेळावा
इचलकरंजी, ता. २३ : केवळ दृढ संकल्प व आत्मविश्वासाच्या जोरावर सत्ता नसतानाही शहरातील अनेक रखडलेले प्रश्न आम आदमी पक्षाच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा व जनतेचे नागरी प्रश्न सोडवा, अशा सूचना ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी मेळाव्यादरम्यान पदाधिकाऱ्यांना केल्या.
राचुरे यांनी शहराला अनेक दशकांपासून घराणेशाहीचे ग्रहण लागले आहे. शहरातील पाणी, यंत्रमाग, पंचगंगा नदीप्रदूषण असे अनेक गंभीर प्रश्न शहरवासीयांना भेडसावत आहेत. मात्र, शहरातील लोकप्रतिनिधी व राज्यकर्ते केवळ आपल्या घरची तिजोरी भरण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षाकडे जनता अपेक्षेने पाहत असून, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू, असे सांगितले. प्रदेश उपाध्यक्ष किशोर मंध्यान यांनी आप हा सर्वसाधारण व्यक्तींचा पक्ष असून, या पक्षात राजकारणविरहित केवळ सामाजिक कार्यावर भर देण्यात येतो, असे सांगितले. विलास राजपूत, संदीप देसाई, नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिषेक पाटील, जावेद मुल्ला, लक्ष्मण पारसे आदी उपस्थित होते. प्रकाश सुतार यांनी प्रास्ताविक केले. वसंत कोरवी यांनी आभार मानले.