
केदार दुरूगडे याला कास्यपदक
77653
विवेकानंद कॉलेजच्या
केदार दुरुगडे याला ‘कास्य’
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : महू (मध्यप्रदेश) येथे झालेल्या ऑल इंडिया ओपन नॅशनल रायफल शूटिंग कॉम्पिटीशनमध्ये विवेकानंद कॉलेजमधील केदार मनोज दुरुगडे (बी.एस्सी.कॉम्प्युटर सायन्स (एंटायर भाग दोन) याने १० मीटर एयर रायफल शूटिंग ज्युनियर प्रकारात कास्यपदक मिळवले. सीनियर गटात त्याला चौथे स्थान मिळाले. त्याची निवड चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्समध्ये झाली. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या उपांत्यफेरीत वर्चस्व राखत त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला. केवळ ०.४ च्या फरकाने त्याला सातवे स्थान मिळाले. त्याचा सत्कार प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्याला जिमखाना अध्यक्ष प्रा. किरण पाटील, बीसीएस विभागप्रमुख प्रा. पल्लवी देसाई, राजेश माने, सहिदा कच्छी यांचे मार्गदर्शन लाभले.