कोळी समाजाचा उद्या मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोळी समाजाचा उद्या मोर्चा
कोळी समाजाचा उद्या मोर्चा

कोळी समाजाचा उद्या मोर्चा

sakal_logo
By

कोळी समाजाचा उद्या मोर्चा
प्रा. बसवंत पाटील; विविध मागण्यांकडे शासनाचे ४० वर्षापासून दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २३ ः जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता. २५) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आदिवासी संघर्ष समितीचे विभागीय अध्यक्ष प्रा. बसवंत पाटील यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील महादेव कोळी जमातींच्या मागण्यांकडे शासनाकडून चाळीस वर्षे दूर्लक्ष केले जात आहे. जातीच्या दाखल्यासाठी १९५० पूर्वीच्या पुराव्याचा आग्रह, आप्तसंबंधी अट, क्षेत्रीय निर्बंधाची अट सांगून नाकारले जाते. शासनाच्याच आदेशानुसार अशा प्रकारच्या दाखल्यांची गरज नाही. जिल्ह्यात केवळ महादेव कोळी जमात राहते. २०११ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ३० हजार २०६ आहे. असे असताना जिल्ह्यातील महादेव कोळी समाजाला शासनाच्या सोयी, सवलतींपासून वंचित ठेवले जाते. यासह समाजाच्या अन्य काही मागण्या आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थी, महिला, शेतकरी, दिव्यांग बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.