एम.आर. हायस्कूल महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एम.आर. हायस्कूल महोत्सव
एम.आर. हायस्कूल महोत्सव

एम.आर. हायस्कूल महोत्सव

sakal_logo
By

एम. आर. हायस्कूलचा शताब्दी महोत्सव रविवारपासून


गडहिंग्लज : येथील महाराणी राधाबाई (एम. आर.) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शताब्दी महोत्सवाला २९ जानेवारी (रविवार) रोजी प्रारंभ होत आहे. यानिमित्त आजी-माजी विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २९ जानेवारी १९२३ रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी या प्रशालेची स्थापना केली. या शंभर वर्षाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभाचा कार्यक्रम २९ जानेवारीला होत आहे. यादिवशी सकाळी ज्योतीचे स्वागत होईल. त्यानंतर शोभायात्रा, १० वाजता शताब्दी महोत्सवाचे उद्‌घाटन, माजी विद्यार्थ्यांचे मनोगत आणि सायंकाळी आजी-माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. प्राचार्य संजय कुंभार, आजी-माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष निशिकांत गोरुले, उपाध्यक्ष बाळ ऊर्फ पोटे-पाटील, संकेत देसाई, सचिन शहा यांच्यासह सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. २८ जानेवारीपूर्वी माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.