
सर्वांगसुंदर गडहिंग्लज हाच ध्यास
GAD231.JPG
77732
गडहिंग्लज : शहरातील एक कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ करताना हसन मुश्रीफ. शेजारी विजय देवणे, किरण कदम, हारुण सय्यद आदी.
----------------------------------------------------------------------
सर्वांगसुंदर गडहिंग्लज हाच ध्यास
आमदार मुश्रीफ : गडहिंग्लजला एक कोटींच्या रस्ता कामांचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, दि. २३ : सर्वांगसुंदर गडहिंग्लज शहर हाच आमचा ध्यास आहे, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. शहरातील एक कोटी रुपये निधीच्या रस्त्याच्या कामांचा प्रारंभ त्यांच्याहस्ते झाला.
संकेश्वर रोड ते डॉ. पाटोळे हॉस्पीटलपर्यंतचा रस्ता खडीकरण (२४ लाख), माणिकबाग रस्ते डांबरीकरण (३५ लाख), नदीवेस येथील शिवगोंडा पाटील घर ते रावळ घर गटर बाधंकाम (१२ लाख), कडगांव रोड नदाफ कॉलनीतील संदीप फगरे घर ते आरबाज नाईकवाडे घर रस्ता मजबुतीकरण (७ लाख), बी. जी. पाटील कॉलनी शेळके घर ते चतुर घरापर्यंत रस्ता खडीकरण-डांबरीकरण (१८ लाख), भिमनगर येथील गणपती कांबळे घर ते मुनीर नदाफ घर गटर बाधंकाम (१२ लाख) आदी विकासकामांचा प्रारंभ केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, किरण कदम, उदय जोशी, वसंत यमगेकर, हारुण सय्यद, नागेश चौगुले, आण्णासाहेब देवगोंडा, सुरेश कोळकी, रियाज शमनजी, प्रतिक क्षीरसागर, डॉ. किरण खोराटे, अशोक मेंडूले, उदय देसाई, सौ. शर्मिली पोतदार, सौ. रेश्मा कांबळे, शारदा आजरी, सुनिल चौगुले, संतोष कांबळे, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, महेश सलवादे, रश्मिराज देसाई, अमर मांगले, उदय परीट उपस्थित होते.