प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृहांची कुलुपे तोडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृहांची कुलुपे तोडली
प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृहांची कुलुपे तोडली

प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृहांची कुलुपे तोडली

sakal_logo
By

chd236.jpg
77749
चंदगड ः प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृहांना कुलूप लावल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना जाब विचारताना बाबूराव हळदणकर, अॅड. संतोष मळवीकर आदी.
-----------------------------------------

प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृहांची कुलपे तोडली
---
चंदगडला शासकीय कामास येणाऱ्या नागरिकांची अडचण दूर; अधिकारी धारेवर
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २३ ः येथील प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृहे अनेक दिवसांपासून कुलपे लावून बंद केली होती. शासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांना स्वच्छतागृहासाठी जायचे झाल्यास बसस्थानक किंवा इतर ठिकाणांचा वापर करावा लागत होता. आज या विषयावर संतप्त झालेल्या नागरिकांनी स्वच्छतागृहांची कुलपे फोडून ती नागरिकांसाठी उपलब्ध केली.
तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यापुढे प्रत्येक खात्याने एका स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली. त्यांनी ती मान्य केल्यावर आंदोलन मागे घेतले. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत बांधली आहे. विविध खात्याची कार्यालये या इमारतीत एकत्र केल्याने नागरिकांची सोयही झाली आहे. परंतु, येथील अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे इमारतीच्या स्वच्छतेचे बारा वाजले आहेत. स्वच्छतागृहे तर कुलूप लावून बंद केली होती. पुरुष, महिला, अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधलेली असतानाही त्याचा वापर करण्यावर प्रशासनानेच बंदी घातली होती. याबद्दल नागरिकांतून नाराजीचा सूर होता. आज या प्रकरणी अॅड. संतोष मळवीकर, प्रभाकर खांडेकर, बाबूराव हळदणकर, विक्रम मुतकेकर यांच्या नेतृत्वाने आंदोलन केले. प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर नागरिकांनीच दगडाने कुलपे फोडून ती उघडी केली. यापुढे कुलूप लागले तर वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्याचा इशारा दिला.
दरम्यान, इमारतीतील सहायक निबंधक कार्यालय, कृषी विभाग, मोजणी खाते आदी विविध विभागांनी या स्वच्छतागृहांच्या दैनंदिन स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली. या आंदोलनाबद्दल नागरिकांतून समाधानाच्या भावना आहेत. दरम्यान, जिल्ह्याच्या विविध भागांत अशा प्रकारे नागरिकांची गैरसोय केली जात असून, त्या विरोधात आंदोलन पुकारणार असल्याचे मळवीकर यांनी सांगितले.