Mon, Feb 6, 2023

कक्ष सेवकांना वेतनाची मागणी
कक्ष सेवकांना वेतनाची मागणी
Published on : 23 January 2023, 4:22 am
कक्ष सेवकांना
वेतनाची मागणी
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयातील कक्षसेवक व कक्षसेविका पदावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकले आहे. ते वेतन त्वरित मिळावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण मराठी कामगार सेनेतर्फे ‘आयजीएम’चे वैद्यकीय अधिकारी दिलीप वाडकर यांना देण्यात आले.
मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. शिष्टमंडळात रवी गोंदकर, प्रतापराव पाटील, महेश शेंडे, योगेश दाभोळकर, शहाजी भोसले, अमित पाल, सागर धुमाळ, संग्राम पोरे आदी उपस्थित होते.