नामांकीत शैक्षणिक संस्था होणार सहभागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नामांकीत शैक्षणिक संस्था होणार सहभागी
नामांकीत शैक्षणिक संस्था होणार सहभागी

नामांकीत शैक्षणिक संस्था होणार सहभागी

sakal_logo
By

नामांकित शैक्षणिक संस्था होणार सहभागी
---
रोटरी एज्युकेशन एक्सोची तयारी ः ३ ते ६ फेब्रुवारीला आयोजन; सकाळ माध्यम समूह माध्यम प्रायोजक
इचलकरंजी, ता. २३ ः येथे ३ ते ६ फेब्रुवारीदरम्यान आयोजित रोटरी एज्युकेशनल एक्स्पोमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामांकित संस्था सहभागी होत आहेत. त्यामुळे इचलकरंजीसह परिसरातील विद्यार्थ्यांना अचूक शैक्षणिक अभ्यासक्रम निवडण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. रोटरी क्लब एक्झिकेटिव्ह संस्थेतर्फे या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
महापालिकेच्या राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे हे प्रदर्शन होणार आहे. डीकेटीई संस्था मुख्य प्रायोजक असून, डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्ट हे सहप्रायोजक आहेत. ‘सकाळ’ माध्यम समूह माध्यम प्रायोजक आहे. प्रदर्शनाची आतापासूनच विद्यार्थी वर्गासह पालकांना ओढ लागली आहे. शिक्षण क्षेत्रातील या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रदर्शनाबाबत उत्सुकता आहे.
प्रदर्शनात अनेक नामांकित संस्थांचा सहभाग असणार आहे. यात डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्था, मुंबई येथील सोमय्या युनिव्हर्सिटी, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भारती विद्यापीठ यासह मुंबई, पुणे, पाचगणी, कोल्हापूर, सांगली येथून अनेक संस्थांचा यात सहभाग आहे. त्यामुळे या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे संयोजकांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची माहिती व्हावी. तसेच, त्यांना योग्य तो अभ्यासक्रम एकाच छताखाली निवडता येईल. यासाठी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे प्रथमच वस्त्रनगरीत आयोजन केले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
----------
शिक्षण तज्ज्ञांचे होणार मार्गदर्शन
या एक्सोमध्ये अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासक्रमांची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी व पालकांना शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी या कालावधीत कार्यक्रमस्थळी विविध सेमिनार होणार आहे. तज्ज्ञांकडून विविध शंकांचे निरसनही केले जाईल.