आता आयजीएममध्ये कुपोषित बालकांवर उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता आयजीएममध्ये कुपोषित बालकांवर उपचार
आता आयजीएममध्ये कुपोषित बालकांवर उपचार

आता आयजीएममध्ये कुपोषित बालकांवर उपचार

sakal_logo
By

आयजीएम फोटो वापरणे
--------------------
आता आयजीएममध्ये कुपोषित बालकांवर उपचार
---
गडहिंग्लजनंतर इचलकरंजीत केंद्र; जिल्हा शल्यचिकित्सक, डी. डी. विभागाकडून मान्यता
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २३ : गडहिंग्लजनंतर जिल्ह्यात इचलकरंजीत कुपोषित बालकांवर उपचारिता पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शहरातील आयजीएम रुग्णालयात कुपोषित केंद्र सुरू करण्यास जिल्हा शल्यचिकित्सक व डी. डी. विभागाकडून मान्यता देण्यात आली. या केंद्राचे कामही सुरू केले आहे.
गडहिंग्लज सेंटर दूर असल्याचे कारण देत काही पालकांकडून उपचारास होणारी हलगर्जी कमी होण्यास मदत होणार आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील कुपोषित मुलांवर वेळीच उपचार झाल्याने भविष्यात त्यांचे प्रमाण कमी होईल. कोरोनामध्ये संसर्गाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने अनेक विभागांना पाचारण केले होते. त्याचा परिणाम या कलावधीत कुपोषित मुलांची संख्या वाढली होती. २०२० मध्ये जिल्ह्यात कुपोषित मुलांची संख्या नऊ हजार ५८४ वर पोचली होती. तीव्र कुपोषित बालकांची संख्या ही ३०० झाली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे कुपोषित मुलांची संख्या सुमारे चार हजार २९४, तर तीव्र कुपोषित ७६ वर आणली होती. त्यात ही घट होत असून, अद्याप ग्रामीण भाग व वाड्यावस्त्यांमध्ये तीव्र कुपोषित बालक आढळून येत आहेत. विविध कारणांमुळे कुपोषित बालकांच्या कुटुंबांकडून उपचारास होणारा वेळ या मुलांच्या जीविताचा धोका वाढवत आहे. यातील मुख्य कारण पोषण पुनर्वसन केंद्र दूर असणे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कुपोषित बालकांवर उपचारांसाठी जिल्ह्यात एकमेव उपचार केंद्र हे गडहिंग्लज येथे आहे. येथे पूरक आहार व उपचार करण्यात येतात. त्यासाठी तीव्र कुपोषित बालकांना सुमारे दहा दिवस उपचारांसाठी येथे दाखल व्हावे लागते. शासन बालकाबरोबर एका व्यक्तीचे जेवण, राहणे याची व्यवस्था मोफत करते. मात्र, जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांमधील नागरिकांना हे ठिकाण फार दूर होते. तसेच, त्यासाठी मात्र बेताची आर्थिक स्थिती व कुटुंबातील सर्वजण मोलमजुरी करीत असल्याने उपचार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास येते. सध्या इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात हा विभाग सुरू होणार असल्याने कुपोषित बालकांसाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे पालकांबरोबर कुपोषण निर्मूलनासाठी झटणाऱ्‍या विभागातून समाधान व्यक्त होत आहे.
-----------
कोट
आयजीएम रुग्णालयात कुपोषित बालकांवर उपचारांसाठी दहा खाटांचे पोषण पुनर्वसन केंद्र सुरू होत आहे. त्यामुळे शहर परिसरातील अनेक कुपोषित बालकांच्या पालकांना सोयीचे होणार आहे. रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉक्टर असून, आणखी आवश्यक पदांची नेमणूक करण्यात येणार आहे.
- डॉ. दिलीप वाडकर, वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम रुग्णालय
-----------
कोट
अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून कुपोषित मुलांचा शोध घेण्यात येतो. त्यांच्यावर उपचार हा who च्या नियमांनुसार वर्गवारी करून करण्यात येतो. रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असणाऱ्‍या मुलांना गडहिंग्लजमध्ये पाठवताना अडचण निर्माण होत होती. आता या मुलांवर शहरात उपचार सुरू होत असल्याने कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे.
- ज्योती पाटील, महिला व बाल विकास अधिकारी
--------------
हातकणंगले तालुक्यातील आकडेवारी दृष्टिक्षेप (ग्राफ करणे)
माध्यम कुपोषित*११३*
तीव्र कुपोषित*७*