बेळगाव ः बोम्मई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव ः बोम्मई
बेळगाव ः बोम्मई

बेळगाव ः बोम्मई

sakal_logo
By

KOP23L77824
बसवराज बोम्मई
------------

कॉंग्रेसची भ्रष्टाचारात
पीएच.डी. ः बोम्मई
आमने-सामने चर्चेला केव्हाही तयार
सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. २३ ः कॉंग्रेसने भ्रष्टाचारात पीएच.डी. केली असून, बंगळूरमध्ये कॉंग्रेसचे आंदोलन म्हणजे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी केलेले नाटक असल्याची टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज येथे केली.
ते, बेळगावला खासगी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनाची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ‘१० ते १५ ठिकाणी कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन केले. बंगळूरला कॉंग्रेसने अनेक घोटाळे केले आहेत. नाल्यावर अतिक्रमण ही त्यांचीच देणगी आहे. लोकायुक्त कार्यालय बंद करत एसीबी संस्थेला अधिकार दिले. लोकायुक्तांकडे कॉंग्रेसच्या तक्रारी वर्ग केल्या जातील.’ सिद्धरामय्या यांनी भ्रष्टाचारावर चर्चेसाठी आव्हान दिल्याच्या मुद्द्यावर बोम्मई यांनी विधिमंडळात त्यावर चर्चा करू, असे सांगितले होते. काँग्रेसवाले पळून गेले. चर्चेला आले नाहीत. विधिमंडळापेक्षा मोठे व्यासपीठ नाही. विधानसभेत त्याचा सामना करण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे. आमने-सामने चर्चेला असो किंवा लोकांसमोर जाहीर चर्चा असो, आम्ही सगळ्याला तयार आहे, असे आव्हानही बोम्मई यांनी दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार म्हादाईचे काम सुरू केले जाईल. लवादाचा आदेश सर्वोच्च न्यायालय इतका महत्त्वाचा आहे. या योजनेचा डीपीआर झाला आहे. ते खोटे असल्याचे सांगत काँग्रेसतर्फे राजकारण सुरू असल्याची टीका बोम्मई यांनी केली.


KOP23L77825
बी. एस. येडियुराप्पा

येडियुराप्पांचा सिद्धरामय्यांना टोला
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कोलार मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी लगाविला. ते, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी आज येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. येडियुराप्पा म्हणाले, ‘मी काही भविष्यवाणी सांगत नाही. निवडणुकीच्या तोंडावर सिद्धरामय्या यांचा ड्रामा सुरू आहे. म्हैसूरला परत जाण्याची तयारी आहे. कोलारमधून निवडणूक लढविल्यास घरी जाणे निश्‍चित आहे. कोलार असो किंवा म्हैसूर सिद्धरामय्या यांचा पराभव अटळ असून, त्यांचे घरी जाणे निश्‍चित आहे.’