सहा वकील झाले न्यायाधीश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा वकील झाले न्यायाधीश
सहा वकील झाले न्यायाधीश

सहा वकील झाले न्यायाधीश

sakal_logo
By

सिंगल फोटो आहेत..


न्यायाधीश परीक्षेत कोल्हापूर अव्वल

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदावर मोहर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ - २०२१ मध्ये झालेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. एकूण ६० पदांसाठी झालेल्या या परीक्षेत जिल्ह्यातील वकिलांनी उज्ज्वल यश संपादन केले. यामध्ये महिला वकिलांनी लक्षणीय यश मिळविले.
....
ॲड. अमृता जाधव ः वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या तर राज्यात १४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. मूळच्या अंबपवाडी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील आहेत. वडील शेतकरी तर आई गृहिणी आहेत. त्या सध्या एलएलएमच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहेत. शहाजी लॉ कॉलेजमधून पदवीधर झाल्या आहेत. प्राथमिक शिक्षण अंबपवाडीच्या विद्यामंदिरात, माध्यमिक शिक्षण अंबप गर्ल्स हायस्कूलमध्ये तर १२ वी विज्ञानचे शिक्षण वारणानगर येथील ‘वायसीडब्ल्यूए’ मधून झाले.
----------

ॲड. स्नेहा साकळे ः शहाजी लॉ कॉलेजमधून २०१५ मध्ये कायद्याची पदवी घेतली. २०१७ मध्ये त्यांनी पुण्यातील श्री नवलमल फिरोदीया लॉ कॉलेजमधून एलएलएम पूर्ण केले. सध्या कोल्हापुरातील जिल्हा न्यायालयात ‘प्रॅक्टीस’ करतात.
--------------
ॲड. तृप्ती इंगवले-नाईक : कसबा बावडा येथील रहिवासी आहेत. शहाजी लॉ कॉलेजमधून २००८ ला कायद्याची पदवी घेतली. २०१० ला शिवाजी विद्यापीठातून एलएलएम पूर्ण केले. २०११ ला नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. घराण्यात वकिलीची कोणतीही पार्श्‍वभूमी नाही. कुटुंबात वडील एकटेच शिकून वीज मंडळातून उच्च अधिकारीपदावरून निवृत्त झाले. वकिली व्यवसाय करताना बॅंकेत कायमची नोकरी मिळाली. लग्नानंतर बॅंकेची नोकरी सोडून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेची तयारी केली. २०१९ मध्ये पहिला प्रयत्न झाला. आता दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. पती अमर नाईक, सासर-माहेरचे कुटुंबीय, ॲड. उमेश माणगावे आणि कोल्हापूर बार असोसिएशनचे सहकार्य लाभले.
----------

ॲड. करण जाधव ः मूळचे कागल येथील असून पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे शालेय शिक्षण श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये तर शहाजी लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. ॲड. के. डी. जाधव यांचे ते चिरंजिव आहेत. निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी, न्यायाधीश के. आर. सिंघल यांच्यासह आई, पत्नी, परिवारासह कोल्हापूर व कागल बार असोसिएशनचे सहकार्य लाभले.
.....
ॲड. प्रगती पाटील ः प्राथमिक शिक्षण चंद्रे (ता. राधानगरी) येथील चंद्रे विद्यामंदिर येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नामदेवराव भोईटे विद्यालयात झाले. शहाजी लॉ कॉलेजमधून त्यांनी २०१५ मध्ये कायद्याची पदवी घेतली. तर २०१७ मध्ये शिवाजी विद्यापीठातून एलएलएम विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्या. त्यांना पती, सासू- सासरे, आई- वडील, जयसिंपूर येथील विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे व ॲड. श्रीकांत चौगुले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.