सरकारी परीक्षांसाठीचे शिये येथील केंद्र बंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारी परीक्षांसाठीचे शिये येथील केंद्र बंद करा
सरकारी परीक्षांसाठीचे शिये येथील केंद्र बंद करा

सरकारी परीक्षांसाठीचे शिये येथील केंद्र बंद करा

sakal_logo
By

फोटो (KOP23L77860)
....

सरकारी परीक्षांसाठीचे
शिये येथील केंद्र बंद करा

संभाजी ब्रिगेडची मागणी : उशीर झालेल्या विद्यार्थ्यांची परत परीक्षा घ्यावी

कोल्हापूर, ता. २३ ः केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन परीक्षेकरिता अवघा एक मिनिट उशीर झाल्याच्या कारणावरून अनेक विद्यार्थी या परीक्षेला मुकले आहेत. त्यांची परीक्षा परत घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने आज केली. सरकारी परीक्षा घेण्यासाठी शिये येथील असणारे केंद्र बंद करावे. कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये परीक्षा केंद्र करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले.
या परीक्षेसाठी शिये-कसबा बावडा मार्गावर एक केंद्र होते. परजिल्ह्यातून आलेल्या काही परीक्षार्थींना हे केंद्र सापडण्यास विलंब झाला. त्यामुळे सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी होणाऱ्या या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता आले नाही. काहींना तर अवघा एक ते दोन मिनिटे उशीर झाल्याने केंद्रचालकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता बसू दिले नाही. परीक्षा केंद्राच्या बाहेर असलेले विद्यार्थी आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी हे केंद्रप्रमुखांना भेटण्याची मागणी करत होते. परंतु केंद्रप्रमुखांनी भेट घेतली नाही. त्यामुळे केंद्राबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न निर्माण झाल्याने आम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेतली. परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. शिये येथील हे परीक्षा केंद्र बंद करावे, अशी मागणी केली असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक नीलेश सुतार यांनी सांगितले. या वेळी विकास भिऊंगडे, अमोल गावडे, अक्षय वडार, भगवान कोइंगडे , चारुशीला पाटील, रंजना पाटील, सीमा सरनोबत आदी उपस्थित होते.