नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नकार
नकार

नकार

sakal_logo
By

वेतनासाठी हमीपत्र
लिहून देण्यास
ॅ़ॅ ‘त्यांचा’ नकार

कोल्हापूर ः महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडील ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी हमीपत्र लिहून देण्यास नकार दिला आहे. जवान तसेच चालकांची या विभागात नेमणूक केली आहे. ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांची मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नसल्याने त्यांचे वेतन रखडले होते. त्याबाबत प्रशासकांकडे निवेदन दिले, शिष्टमंडळांनी भेट घेतल्या. त्यानंतर तोडगा म्हणून हमीपत्र भरून घेऊन वेतन देण्याचा निर्णय झाला. त्या हमीपत्रात घातलेल्या अटी अग्निशमनमधील कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत. त्यामुळे हमीपत्र भरून देण्यास नकार दिला. त्याबाबत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोसले यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी अन्यायकारक अटी प्रशासनाकडून काढून टाकण्याबाबत प्रयत्न केला जाईल असे सांगितले. त्यातून मार्ग निघाला नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची मते व्यक्त करण्यात आली.