जिल्हा ज्युदो संघाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा ज्युदो संघाचे यश
जिल्हा ज्युदो संघाचे यश

जिल्हा ज्युदो संघाचे यश

sakal_logo
By

77908

जिल्हा ज्यूदो संघाला
विभागीय स्पर्धेत आठ पदके

कोल्हापूर, ता. २५ ः सातारा येथे झालेल्या विभागीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा ज्यूदो असोसिशनच्या खेळाडूंनी यश मिळवले. चार सुवर्णपदकांसह तीन रौप्य आणि एक कास्य अशा एकूण आठ पदकांची कमाई या संघाने केली. दरम्यान, विजेत्या खेळाडूंचे असोसिएशनतर्फे बाबूजमाल दर्गा येथील छत्रपती शिवाजी हॉलमध्ये प्रशिक्षिका अपर्णा पाटोळे यांच्या हस्ते सत्कार झाले.
एकोणीस वर्षाखालील मुलांमध्ये ४५ किलोखालील गटात कृष्णनाथ पोतदार, ५५ किलोखालील गटात केदार सुभेदार यांनी सुवर्णपदके पटकावली. सतरा वर्षाखालील मुलांमध्ये ४५ किलोखालील गटात दिग्विजय पाटोळे, ८१ किलोखालील गटाक व्यंकटेश हराळे यांनी सुवर्णपदके मिळवली.
चौदा वर्षांखालील मुलांमध्ये ५० किलोवरील गटात सिद्धेश गंडमाळेने तर चौदा वर्षांखालील मुलींमध्ये ३६ किलोखालील गटात आर्या खवरेने रौप्यपदके पटकावली. सतरा वर्षांखालील मुलांमध्ये ५५ किलोखालील गटात ओमकार खवरेने कास्य तर शौर्य पाटोळेने ६० किलोखालील गटात रौप्यपदक पटकावले.
चौदा वर्षांखालील मुलींमध्ये माही डवर, मुलांमध्ये ओम पोतदार, सतरा वर्षांखालील मुलींमध्ये ऋणी गायकवाड, पूर्वा सोहोनी, निहारिका हावळ यांनी सहभाग नोंदवला.