महिलांना साडी, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांना साडी, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
महिलांना साडी, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

महिलांना साडी, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

sakal_logo
By

ich242.jpg
77916
इचलकरंजी : महिलांना स्वप्नील आवाडे यांच्याहस्ते साडी वाटप करण्यात आले.
महिलांना साडी, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
इचलकरंजी : येथील अखिल महाराष्ट्र कोल्हाटी, डोंबारी समाज संघटना व जनरल हमाल माथाडी कामगार संघटनेतर्फे यशवंत लाखे यांच्या जयंतीनिमित्त निराधार व गरजू महिलांना साडी व विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप केले. स्वप्नील आवाडे, प्रकाश दत्तवाडे, तानाजी पोवार, धोंडीलाल शिरगावे, अशोक शिंदे, विठ्ठल चोपडे आदी उपस्थित होते.
-----------------------
ich243.jpg
77917
इचलकरंजी : भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
गंगामाई गर्ल्स हायस्कूलचे यश
इचलकरंजी : राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विदयार्थिनींनी यश संपादन केले. परिक्षेसाठी १८५ विद्यार्थिनी प्रविष्ठ झाल्या होत्या. प्रशालेचा निकाल ७८.३७ टक्के लागला आहे. पाचवी ते दहावीचा १०० टक्के निकाल लागला. आठवीच्या रिया कवडे हिने सुवर्णपदक पटकावले. सुविधा शिंदे हिने रौप्यपदक, अमृता शिंदेने कास्यपदकाची कमाई केली. प्रशालेत यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव केला. मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर, एस. एस. गरमे, व्ही. एन. कांबळे, एस. व्ही. पाटील उपस्थित होते.
-----------------------
जातीनिहाय जनगणनेची मागणी
इचलकरंजी : जातीनिहाय जनगणनेची केंद्र सरकारकडे विविध पक्षांनी वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारने सोयीस्कर याला बाजूला ठेवून जातीचे कलह पेरणाचे काम केले आहे. मराठा आरक्षण समस्याही गंभीर बनली आहे. यावर एकच मार्ग आहे जातीनिहाय जनगणना करून शिंदे सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे पुरोगामीत्व देशाला दाखवून द्यावे, अशा मागणीचे निवेदन शहर दलित पॅथरच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांना दिले. शिष्टमंडळात युवराज जाधव, प्रा. अशोक कांबळे, अनिल कांबळे, डी. एस. डोणे, रमेश शिंदे उपस्थित होते.
---------------------
ich244.jpg
77918
इचलकरंजी : ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत डीकेटीई इंग्लिश मेडियमच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
डीकेटीई इंग्लिश मेडियमचे यश
इचलकरंजी : कला संचालनालयातर्फे घेतलेल्या शासकीय रेखा कला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत डीकेटीई इंग्लिश मेडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. इंटरमिजिएट परीक्षेत राशी नावंधर, वैभवी वेदपाठक, अखिला धूत्रे, सुकृत चचडी यांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली. मैत्रयी जाधव, प्राची मैत्री, प्राची पारीख व जान्हवी साखरे यांना ‘ब’ श्रेणी प्राप्त झाली आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत श्रीहरी केसरवानी यास ‘अ’ श्रेणी, श्रावणी बडवे, सोनिष्का महाजन व गुंजन नावंधर यांना ‘ब’ श्रेणी प्राप्त झाली आहे. १० विद्यार्थी ‘क’ श्रेणीने उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक संजय फुले यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका भारती कासार यांचे प्रोत्साहन लाभले.