दिव्यांग संघटनेतर्फे खंजीरे यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग संघटनेतर्फे खंजीरे यांचा सत्कार
दिव्यांग संघटनेतर्फे खंजीरे यांचा सत्कार

दिव्यांग संघटनेतर्फे खंजीरे यांचा सत्कार

sakal_logo
By

ich45.jpg
77921
इचलकरंजी ः संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना एटीएम कार्ड देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल राहूल खंजीरे यांचा लाभार्थ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

दिव्यांग संघटनेतर्फे
खंजीरे यांचा सत्कार

इचलकरंजी, ता. २४ ः संजय गांधी निराधार योजनेतील जुन्या दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हा बँकेतून एटीएम कार्डचे वाटप सुरू केले आहे. याबाबत संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष राहूल खंजीरे यांनी पाठपुरावा केला. त्याबद्दल त्यांचा लाभार्थ्यांवतीने सत्कार केला.
इचलकरंजीतील निराधार योजनेमधील जिल्हा बँकेमध्ये सुमारे वीस हजार लाभार्थी पेन्शन घेत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना पोस्टमार्फत घरपोच पेन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने जुन्या लाभार्थ्यांना एटीएम कार्डाच्या माध्यमातून पेन्शन वाटप करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे समितीचे माजी अध्यक्ष खंजीरे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली होती. त्याला यश आले असून जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना एटीएम कार्डचे वाटप सुरू केले.
प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह विविध दिव्यांग संघटनांनी खंजीरे यांचा सत्कार केला. इरफान बागवान, अंजना सुतार, अनिल नगरे, सचिन कांबळे, सावली अपंग संस्थेचे अध्यक्ष राजकुमार गेजगे आदी उपस्थित होते.