जागतं कोल्हापूर भाग ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतं कोल्हापूर भाग ४
जागतं कोल्हापूर भाग ४

जागतं कोल्हापूर भाग ४

sakal_logo
By

लोगो टुडे १ अँकरमधून
-
फोटो 77999
--
सब हेड-
तरूणाईचा रोजगारमंत्र; २०० हून अधिक हातगाड्यावर अंडा बुर्जीचा कोल्हापूरी ब्रॅण्ड
-
मेन हेडिंग
स्वाभिमानाची लढाई, देते हक्काची कमाई

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. २४ ः वडील रिक्षा चालवतात, आई स्वयंरोजगाराच काम करते, दोन मुलांपैकी एक शाळेत जातो. दुसरा मोठा बारावी नापास असून, कामाच्या शोधात आहे. सायंकाळी मंडळात जातो. रात्री दुचाकीवरून भटकून बाराला घरी येतो. नोकरी मिळत नाही या सबबीवर रिकामे फिरणाऱ्यांनी शहरात रात्रीचा फेरफटका मारावा. शहरातील तब्बल २०० हून अधिक हातगाड्यावर अंडा बुर्जीचा कोल्हापूरी ब्रॅण्ड ही हक्काची कमाई आणि स्वाभिमानाचे जगणं जगणाऱ्यांची झलक पाहायला मिळते.

सोमवारी सायंकाळी सातला मध्यवर्ती बसस्थानकसह विविध ठिकाणी अंडा बुर्जी गाड्या लागल्या. एकाने कांदा कपायला घेतला. अवघ्या अर्ध्या तासात बुट्टीभर कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर बारीक झाली. दुसऱ्याने गॅस पेटवला. क्रेटमधील एकेक अंडे उचलत चंबू फोडलं. तेल, चटणी मीठ घालून एकजीव केले. बिडाच्या तपालेल्या तव्यात अंड्याचा गाभा ओतला तसा चर्रचर्र झालेल्या आवाजाने ग्राहकांना जणू आरोळी दिली. सिंगल आम्लेट, डबलबुर्जी, बुर्जी पुलाव्याच्या फर्मायीशी आल्या. बुर्जीवाल्या अकबरने हात वेगाने हालवत उलाथण्याने आम्लेट परतले. दुसऱ्या भांड्यात बुर्जी गदागदा हलवली. वाफळलेली बुर्जी व अम्लेट चकचकीत ११ मिनिटात तयार झाली. ग्राहकाने अवघ्या दहा मिनिटात ताव मारत ७० रूपयाचे बिल दिले. त्यासोबत आणखी दोन चार ग्राहक आले. त्यांच्यासाठी आम्लेट पुलावा तयार होताना रात्रीच घड्याळ पुढे सरकले. रात्री आकराला गर्दी वाढली. कामाला आणि खाण्यालाही गती आली. पोलिसांच्या शिट्या वाजल्या, कामाचा वेग वाढला असताना गाडी बंद करण्याची धावपळ सुरू झाली. गाडी ढकलतच आडोशाला लावली. काम संपलं नाही, थोडा वेळ गप्पा मारून साडे बाराला हिशेब व गाडीतील मालाचे पॅकींग झाले. तेव्हा एक वाजता दोघे घरी गेले.
पहाटे पाच वाजता दुसरा सहकारी हीच गाडी घेऊन बसस्थानक परिसरात आला. वाफळलेला चहा पोहे, सकाळी दहापर्यंत मिळू लागला. बोलता बोलता अकबरने व्यवसायच गणितं उलगडले. ते बेरोजगारांनी अंड्याचाच नव्हे तर कोणताही व्यवसाय चिकाटीने केल्यास हमखास कमाई होते, याची साक्ष देणारे ठरले.

(आकडे ठळक वापरावेत)
अंडे का फंडा...
-एका गाडीवर जातात कमीत कमी ४० ते १०० प्लेट अंडी पदार्थ
-एक प्लेटला मिळतात किमान ४० रूपये
-कमीत कमी उत्पादन खर्च - ४०० ते १ हजार
-रोजचा व्यवसाय- १६०० ते ४ हजार रूपये
-महिन्याच्या २६ दिवसात मिळतात- ४१ हजार ६०० ते १ लाख ४ हजार
-यातील उत्पादन खर्च- १० हजार ४०० ते २६ हजार
-उर्वरित सर्व नफा
-एका रात्रीत शहरातील २०० गाड्यावर होणारी उलाढाल-३ लाख
-यात राबणारे ७० टक्के तरूण सातवी ते पदवीधर शिक्षण घेतलेले