
तळसंदेत आजपासून कार्यक्रम
तळसंदेत आजपासून कार्यक्रम
तळसंदे, ता. २४ : तळसंदे (ता. हातकणंगले) येथे लोकवर्गणीतून उभारलेल्या श्री गणेश मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा, लोकार्पण सोहळा आणि विविध विकास कामांचे उद्घाटन, मान्यवरांच्या सत्कार असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी ॲड. दौलत मोहिते आहेत.
बुधवारी (ता. २५) आमदार डॉ. विनय कोरे, शुभलक्ष्मी कोरे, खासदार धैर्यशील माने, वेदांतिका माने यांच्याहस्ते उद्घाटन होईल. आमदार सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, ध्रुव मोहिते यांच्याहस्ते नुतन इमारत, दुकान गाळे, हॉल इमारतीचे उद्घाटन होईल. गुरुवारी (ता. २६) वारणा बँकेचे अध्यक्ष निपूण कोरे, स्नेहा कोरे यांच्याहस्ते होमहवन, धार्मिक कार्यक्रम होतील. सायंकाळी सात वाजता प्रा. शिवाजीराव भुकेले यांचे प्रवचन होईल. २७ रोजी भगवानगिरी महाराज यांच्याहस्ते सकाळी मुर्ती प्रतिष्ठापणा आणि डॉ. डी. वाय. पाटील, शांतादेवी डी. पाटील यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठापणा, महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन होईल.