कृषी पंप वीज थकबाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी पंप वीज थकबाकी
कृषी पंप वीज थकबाकी

कृषी पंप वीज थकबाकी

sakal_logo
By

महावितरणचा लोगो -
...

कृषी पंपांची थकबाकी ४४६ कोटी

जिल्ह्यातील स्थिती : कोल्हापूर परिमंडळात १ लाख ४६ हजार थकबाकीदार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २४ : जिल्ह्यातील जिल्हा कृषी पंप वीज ग्राहकांकडे महावितरणची ४४६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांकडून वीज बिले भरली जात नसल्याने हा आकडा वाढत आहे. नवीन कृषी पंप धोरणात थकबाकीदारांना तीस टक्के सूट देऊनही त्याचा लाभ ग्राहक उठवताना दिसत नाहीत.
कृषी पंपांना वीजपुरवठा करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, असा महावितरणचा प्रयत्न आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये, याची दक्षता महावितरण प्रशासन घेत असले तरी काही वेळेस पुरवठा खंडित होतो. शेतकऱ्यांनी वेळेत वीज बिल भरावे, यासाठी नवीन कृषी पंप धोरण-२०२० मध्ये तीस टक्के सूट देण्यात येत असून, विलंब आकार व व्याज पूर्णत: माफ करण्यात येत आहे. तरीही ग्राहकांकडून बिलांचा भरणा वेळेवर होत नसल्याने थकबाकीच्या आकड्यात भर पडत असल्याचे दिसत आहे. राज्यात सोलापूर परिमंडळात सर्वाधिक थकबाकी असून, सांगलीची थकीत व चालू बिलाची थकबाकी २ हजार ३७९ कोटी रुपये आहे. कोल्हापूर परिमंडळाचा विचार करता थकबाकीचा आकडा १ हजार ९६२ कोटी रूपयांवर पोचला आहे. परिमंडळात एकूण १ लाख ४६ हजार थकबाकीदार आहेत. चारचाकी वाहन वापरणारे, बंगल्यात राहणारे व नियमित आयकर भरणारे बिले भरताना टाळाटाळ करत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. त्यांच्याकडून बिले लवकर भरली जावीत, यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
---------------
* थकबाकी अशी :
- गडहिंग्लज - ६३ कोटी ५४ लाख
- इचलकरंजी - १३ कोटी ४४ लाख
- जयसिंगपूर - १२४ कोटी
- कोल्हापूर शहर - १ कोटी ११ लाख
- कोल्हापूर ग्रामीण विभाग १ - ११४ कोटी ३३ लाख
- कोल्हापूर ग्रामीण विभाग २ - १३० कोटी ४६ लाख
-----------------
चौकट
पाच वर्षांत एकही
वीज बिल भरले नाही

जिल्ह्यातील ७.५ हॉर्सपॉवरपेक्षा अधिक वीज भार असलेल्या २ हजार १४३ कृषी पंप ग्राहकांनी पाच वर्षांहून अधिक काळात एकही वीज बिल भरलेले नाही, असे महावितरणच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांच्याकडे २६ कोटी ४५ लाख रुपये इतकी थकबाकी आहे.