Wed, Feb 8, 2023

भव्य तिरंगा
भव्य तिरंगा
Published on : 24 January 2023, 4:12 am
गंगावेशमध्ये उद्या देशभक्तीपर उपक्रम
कोल्हापूर ः प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गंगावेश परिसरात पंधरा बाय चाळीस फूटाचा भव्य तिरंगा, देशभक्तीपर गीतांसाठी कराओके सिस्टीम, तिरंगा टॅट्यू, आर्मी जवान सेल्फी अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. नानबान फाऊंडेशन मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित उत्तरेश्वर थाळी परिवाराने आयोजन केले असून, गुरूवारी (ता.२६) दिवसभर हे कार्यक्रम होतील. स्वातंत्र्यचळवळीत योगदान दिलेल्यांचे स्मरणही यानिमित्ताने होणार आहे. त्याशिवाय गरजूंना व्हेज बिर्याणी व मिठाईचे वितरण होणार आहे.