Tue, Jan 31, 2023

प्रज्ञा, ईशाची निवड
प्रज्ञा, ईशाची निवड
Published on : 25 January 2023, 12:30 pm
ईशा शिंत्रे 78103
प्रज्ञा जाधव 78104
प्रज्ञा, ईशाची निवड
कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालयातील सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या एनसीसी छात्र ज्युनियर अंडर ऑफिसर प्रज्ञा जाधव, सीक्युएमएस ईशा शिंत्रे यांची २८ रोजी गुजरातमध्ये होणाऱ्या एएलसी कॅम्पमध्ये निवड झाली. अमरावती येथे झालेल्या बीएलसी कॅम्पमधून त्यांची निवड झाली होती. एएलसी कॅम्पमध्ये त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लीडरशिप एसएसबी कॅप्सुल या विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य आर. आर. कुंभार, सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडर ऑफिसर कर्नल एस. गणपती, एओ मेजर ए. गुगामली, एनसीसी प्रमुख कॅप्टन सुनीता भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.