मगदूम ठरल्या पैठणीच्या मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मगदूम ठरल्या पैठणीच्या मानकरी
मगदूम ठरल्या पैठणीच्या मानकरी

मगदूम ठरल्या पैठणीच्या मानकरी

sakal_logo
By

78239
गडहिंग्लज : सकाळ तनिष्कातर्फे झालेल्या स्पर्धेतील विजेत्या महादेवी मगदूम यांना श्रद्धा शिंत्रे यांनी मानाची पैठणी दिली. यावेळी तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या.

मगदूम ठरल्या पैठणीच्या मानकरी
गडहिंग्लजला स्पर्धा; सकाळ तनिष्का-सारथीतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : सकाळ तनिष्का व्यासपीठ आणि सारथी फाउंडेशनतर्फे महिलांसाठी पर्यावरणपूरक हळदी-कुंकूसह खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात झाला. त्यामध्ये महादेवी मगदूम या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. चारशेहून अधिक महिलांची या वेळी उपस्थिती होती.
कडगाव रोडवरील एमएसईबी कार्यालयाजवळच्या सारथी फाउंडेशनच्या आवारात हा कार्यक्रम झाला. खेळ पैठणीचा स्पर्धे अंतर्गत विविध खेळांच्या सहा फेऱ्या झाल्या. यामध्ये शंभर महिलांनी भाग घेतला होता. तनिष्का व्यासपीठाच्या गटप्रमुख तथा माजी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळ तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. या वेळी झालेल्या स्पर्धांमधून सहा फेऱ्या झाल्या. त्यात पाच महिलांनी विजेतेपद पटकावले. महादेवी मगदूम यांनी मानाच्या पैठणीवर आपले नाव कोरले. तसेच शोभा जिनगी, सुरेखा केसरकर, भाग्यश्री शिंत्रे, प्रतिभा पाटील या विजेत्यांनाही आकर्षक बक्षीस देवून गौरविण्यात आले. अभिनेता अमोल देसाई यांनी महिलांसाठीच्या या स्पर्धेचे संयोजन केले. विविध खेळ खेळताना महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला होता.
या वेळी उपस्थित फुटबॉलपटू अंजली तुरंबेकर यांनी महिलांना चालत फुटबॉल कसे खेळायचे ही नवी संकल्पना समजावून सांगण्यासह खेळाचे व व्यायामाचे महत्व पटवून दिले. लवकरच महिलांसाठी प्रशिक्षण घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. सकाळ तनिष्का गटप्रमुख श्रद्धा शिंत्रे यांच्यासह शोभा शिंत्रे, अनिता शिंदे, माधुरी पाटील, संगितूा चौगुले, सुधा फाळके, शारदा सुतार, क्रांती शिवणे, सुजाता पाटील, ऋजुता शिंत्रे व महिलांनी कार्यक़्रमाचे नियोजन केले होते.