गड-धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-धरणे आंदोलन
गड-धरणे आंदोलन

गड-धरणे आंदोलन

sakal_logo
By

78183
गडहिंग्लज : संकेश्वर-बांदा महामार्गबाधित शेतकऱ्यांचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले.
-------------------


महामार्गबाधित शेतकऱ्यांची धरणे

गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर आंदोलन : ३१ जानेवारीपासून वहिवाट मोजणीचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : संकेश्वर-बांदा महामार्गाच्या वहिवाट मोजणीचे आश्वासन पाळले जात नसल्याच्या कारणावरून महामार्गबाधित शेतकऱ्यांनी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. महामार्गबाधित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३१ जानेवारीपासून वहिवाट मोजणीचे आश्वासन दिल्याने सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
संकेश्वर-बांदा महामार्गाच्या कामाबाबत शेतकऱ्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. तसेच महामार्गबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली आहे. याच प्रश्नावरून शेतकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत वहिवाट मोजणीचे निश्चित केले होते. मात्र, प्राधिकरणाकडून त्यावर काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज सकाळी अकरापासून प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता टी. एस. शिरगुप्पे यांनी संघटनेला लेखी पत्र दिले. वहिवाट मोजणीचा कार्यक्रम २४ जानेवारीपासून सुरू केला जाणार होता. पण, प्रशासकीय कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला आहे. ३१ जानेवारीपासून मोजणीला सुरुवात करण्याचे आश्वासन या पत्रातून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव, संजय तर्डेकर, सुरेश वडराळे, महादेव शिंगे, बाळासाहेब देसाई, वसंत देवळकर, जयवंत थोरवतकर, अनिल सुतार, सचिन लोहार, गणपती येसणे, परसू खोराटे, दत्तात्रय शेवाळे, रामा तांबे, मारुती इंगळे, चंद्रकांत तेजम, पांडुरंग कुंभार, सावित्री सुतार, अनिता भाटले, आक्काताई खोराटे, काशव्वा नाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.