शाळा दुरुस्‍ती आराखडा मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा दुरुस्‍ती आराखडा मंजूर
शाळा दुरुस्‍ती आराखडा मंजूर

शाळा दुरुस्‍ती आराखडा मंजूर

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद .... लोगो
...

शाळा दुरुस्‍ती आराखडा मंजूर

स्‍थायी समिती बैठकीत निर्णय

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २५ : जिल्‍हा वार्षिक योजना सन २०२३-२४ सालासाठी शिक्षण विभागाने शाळा दुरुस्‍तीचा २१५ कोटींचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास स्‍थायी समितीने मान्यता दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा पार पडली.

दरवर्षी जिल्‍हा नियोजन समितीकडून प्राथमिक शाळांच्या दुरुस्‍तीसाठी जिल्‍हा परिषदेला निधी देण्यात येतो. सन २०२१-२२ सालासाठी १२ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली होती. पुनर्विनियोजनात ही तरतूद १० कोटी ६५ लाख ८० हजार करून ती खर्च करण्यात आली. तर २०२२-२३ सालासाठी अर्थसंकल्‍पात १६ कोटी ५३ लाख ५० हजार रुपयांची तरतूद केली होती. यातील जानेवारी २०२३ अखेर फक्‍त १ कोटी ८४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर सन २०२३-२४ सालासाठी २१५ कोटी रुपये इतक्या र‍कमेची मागणी करण्यात आली आहे. हा आराखडा आज जिल्‍हा परिषदेच्या स्‍थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला समितीने मंजुरी दिली आहे. शनिवारी (ता. २८) पुणे येथे विभागीय अर्थसंकल्‍पीय बैठक घेतली जाणार आहे. त्या ठिकाणी या आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे.
....

अपघातात र‍कमेची भरपाई

आरोग्य विभागाच्या वाहनाला चंदगड येथे अपघात झाला होता. त्या अपघातात मृत झालेल्या एका कर्मचाऱ्या‍च्या वारसाने दावा दाखल केला होता. त्या दाव्यात जिल्‍हा परिषदेला ८० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, ही रक्‍कम कोणत्या निधीतून द्यायची, असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. यावरही सविस्‍तर चर्चा करण्यात आली. सेस फंडातून हा निधी देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.