देसाई हॉस्पिटलमध्ये कर्नाटकच्या रुग्णांनाही मिळणार योजनांचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देसाई हॉस्पिटलमध्ये कर्नाटकच्या रुग्णांनाही मिळणार योजनांचा लाभ
देसाई हॉस्पिटलमध्ये कर्नाटकच्या रुग्णांनाही मिळणार योजनांचा लाभ

देसाई हॉस्पिटलमध्ये कर्नाटकच्या रुग्णांनाही मिळणार योजनांचा लाभ

sakal_logo
By

देसाई हॉस्पिटलमध्ये कर्नाटकच्या
रुग्णांनाही मिळणार योजनांचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : येथील देसाई हॉस्पिटलमध्ये आता कर्नाटकातील रुग्णांना सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट व आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. २५ जानेवारीपासून या योजनांची अंमलबजावणी हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे. उपचारासाठी येणाऱ्या कर्नाटक सीमाभागातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
गडहिंग्लज उपविभागासह कर्नाटक सीमाभागातील रुग्णही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. महाराष्ट्र सरकारची महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यान्‍वित आहे. केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजनाही सुरू आहे. पण, या योजनांचा लाभ कर्नाटकातील रुग्णांना मिळत नव्हता.
दरम्यान, २५ जानेवारीपासून हॉस्पिटलमध्ये कर्नाटक शासनाची सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट व आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. त्याचा फायदा सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील रुग्णांना मिळणार आहे.