नितीन गडकरी- अंबाबाई, शंकराचार्य मठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी- अंबाबाई, शंकराचार्य मठ
नितीन गडकरी- अंबाबाई, शंकराचार्य मठ

नितीन गडकरी- अंबाबाई, शंकराचार्य मठ

sakal_logo
By

78681
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी शंकराचार्य मठाला भेट दिली. त्यावेळी त्यांचा सत्कार करताना सचिव शिवस्वरूप भेंडे. शेजारी खासदार धनंजय महाडिक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, रामभाऊ देशपांडे आदी.
78682
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. या वेळी राहुल चिक्कोडे, खासदार धनंजय महाडिक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवराज नाईकवाडे आदी.


जनतेच्या भल्याचे कार्य हातून घडावे
नितीन गडकरी; श्री अंबाबाईला साकडे, शंकराचार्य मठात सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : आमच्या हातून जनतेच्या भल्याचे कार्य घडावे. त्यासाठी कायम आशीर्वाद राहू दे, असे साकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घातले. कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, ही परिस्थिती पूर्णपणे बदलू दे आणि सर्वांना सुख-समृद्धीचे दिवस येऊ देत, अशीही देवीकडे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बऱ्याच वर्षांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतल्याचेही मंत्री गडकरी म्हणाले. या वेळी देवस्थान समितीतर्फे त्यांचा सत्कार झाला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिक्कोडे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, अजित ठाणेकर आदी उपस्थित होते.

शंकराचार्य पीठाच्या
जमिनींचा मोबदला मिळावा
रस्त्याच्या कामामध्ये ज्या ठिकाणी शंकराचार्य पीठाच्या जमिनी जाणार असतील त्याचा मोबदला पीठालाच मिळावा, अशा मागणीचे निवेदन शंकराचार्य पीठातर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री गडकरी यांनी येथील शंकराचार्य पीठाला भेट दिली. या वेळी अध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी स्वागत केले. पीठातर्फे त्यांचा सत्कार झाला. या वेळी सचिव शिवस्वरूप भेंडे म्हणाले, ‘जिल्ह्याबरोबर विविध ठिकाणी पीठाच्या जमिनी आहेत. सध्या विविध ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामध्ये पीठाच्या जमिनी घेतल्या जात आहेत. या जमिनींचा मोबादला पीठालाच मिळण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.’ या वेळी खासदार धनंजय महाडिक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रामकृष्ण देशपांडे आदी उपस्थित होते.

वाहनांचा ताफा थांबवून नमस्कार
शंकराचार्य पीठातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर गडकरी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गडकरी यांनी आपला ताफा येथे थांबवला आणि वाहनातून उतरून सर्वांना नमस्कार केला. ‘कसे काय बरे आहात ना सगळे’ अशीही त्यांनी सर्वांची विचारपूस केली आणि त्यानंतर वाहनांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला.