
सुर्यनमस्कार दिवस विशेष
नियमित सूर्यनमस्कार अशीच
जीवनशैली असावी : माळकर
कोल्हापूर : ‘‘विविध आजारांना हमखास निमंत्रण देणाऱ्या पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्सचा पूर्णपणे त्याग करा. नियमित योगा, सूर्यनमस्कार, स्थानिक सकस आहार विद्यार्थ्यांनी घ्यावा. त्यासाठी शिक्षक, पालकांनी आग्रही असावे,’’ असे प्रतिपादन आरोग्य भारतीच्या जिल्हाध्यक्ष वैद्य अश्विनी माळकर यांनी केले.
जागतिक सूर्यनमस्कार दिन, रथसप्तमीनिमित्त आदर्श प्रशाला, शिवाजी पेठ येथे कार्यक्रम झाला. या वेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी योग शिक्षिका डॉ. उल्का देशपांडे यांनी दोन सत्रात मुला-मुलींकडून सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके करून घेतली. सूर्यनमस्कारात असणारी विविध योगासने, शरीरास होणारे फायद्यांची माहिती दिली. मुख्याध्यापक आर. वाय. पाटील यांनी स्वागत केले. प्रशांत आयरेकर यांचा आरोग्य भारतीतर्फे सत्कार करण्यात आला. प्रमोद व्हनगुते यांचाही सत्कार झाला. सिद्धगिरी, कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारीला होणाऱ्या ‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोउत्सवाची माहिती राजेंद्र मकोटे यांनी दिली. स्वरा सातुशे, साची शिंदे हिने परिचय करून दिला. विज्ञान शिक्षिका संगीता शिंदे यांनी आभार मानले. आरोग्य भारतीचे संदीप धोंगडे, माधव नारायण कुंभोजकर यांच्यासह सागर ठाणेकर उपस्थित होते. शिक्षक ए. के. देसाई, डी. पी. सुतार, आर. बी. माने यांनी परिश्रम घेतले.