दुसऱ्या दिवशीही पंजाब, हरियाणाच्या विद्यापीठांना सुवर्णपदके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या दिवशीही पंजाब, हरियाणाच्या विद्यापीठांना सुवर्णपदके
दुसऱ्या दिवशीही पंजाब, हरियाणाच्या विद्यापीठांना सुवर्णपदके

दुसऱ्या दिवशीही पंजाब, हरियाणाच्या विद्यापीठांना सुवर्णपदके

sakal_logo
By

78811
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठातील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात सोनू याने सुवर्ण पदक, रोहन रंडे याने रौप्य पदक, रविंदर व रॉबिनसिंग यांनी कांस्यपदक मिळविले.

शिवाजी विद्यापीठाच्या रोहनला रौप्य

दुसऱ्या दिवशीही पंजाब, हरियाणाच्या विद्यापीठांना सुवर्णपदके

लोगो- अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी शिवाजी विद्यापीठाच्या रोहन रंडे या कुस्तीपटूने ९७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. विद्यापीठाचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. पंजाब आणि हरियाणा येथील विद्यापीठांच्या कुस्तीपटूंनी चार विविध गटांमध्ये सुवर्णपदके जिंकली. उद्या, रविवारी स्पर्धेचा अखेरचा दिवस आहे. स्पर्धेत देशभरातील १३१ विद्यापीठांचे ८९४ कुस्तीपटू सहभागी झाले आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात २२ जानेवारीपासून राष्ट्रीय कुस्त्यांचा थरार पाहायला मिळतो आहे. ग्रीको-रोमन स्पर्धेमुळे तर सामने अधिकच रंगतदार बनले आहेत. अत्यंत चपळतेने व चुरशीने होत असलेले हे सामने पाहण्यासाठी कुस्तीशौकिनांची गर्दी आहे. स्पर्धेमध्ये पंजाब-हरियाणाच्या कुस्तीपटूंचे निर्विवाद वर्चस्व असले तरी यजमान शिवाजी विद्यापीठाच्या कामगिरीकडेही सर्वांचेच लक्ष लागून आहे. विद्यापीठाचे स्पर्धेत सहभागी दहा कुस्तीपटू बाद फेरीच्या सामन्यांमध्ये अत्यंत चुरशीने प्रतिस्पर्ध्यांना झुंजवित आहेत. पदकाच्या दृष्टीने कालचा दिवस सुना गेला असला, तरी आज रोहन रंडे याने ही उणीव भरून काढली. ९७ किलो वजनी गटात त्याने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली, मात्र अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाच्या सोनू याच्याकडून त्याला पराभव पत्करावा लागला. रोहनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रोहन हा गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या स्पर्धेत आज ९७, ७७, ६७ आणि ६० किलो अशा चार वजनी गटांचे कुस्ती सामने खेळविण्यात आले. यामध्ये अनुक्रमे गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर (पंजाब), लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा (पंजाब), महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक (हरियाणा) आणि कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र (हरियाणा) या चार विद्यापीठांनी सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली.

संतोष हिरूगडे उपांत्यपूर्व फेरीत
६० किलो वजनी गटात शिवाजी विद्यापीठाच्या संतोष हिरुगडे याने अत्यंत चिवट खेळीचे प्रदर्शन करीत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तो अर्जुननगरच्या देवचंद महाविद्यालयाचा कुस्तीपटू आहे.

विविध वजनी गटांतील विजेते
या स्पर्धेत आज विविध वजनी गटांतील विजेत्यांमध्ये (अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके विजेते) ६० किलो : हर्ष राणा (कुरूक्षेत्र), हरदीप सिंग (चंदीगढ), अजित कुमार (वाराणसी), दिनेश कुमार (हरियाणा). ६७ किलो: अनिल (रोहतक), सौरभ (छत्तीसगढ), अंकित (मंडी), अमित कुमार (शिखर). ७७ किलो : करण (फगवाडा), रोहित बुरा (रोहतक), अभिमन्यू (चंदीगढ), सागर (कुरूक्षेत्र). ९७ किलो : सोनू (पंजाब), रविंदर (जयपूर), रॉबिन सिंग (रोहतक)