
युवा कवीसंमेलन
इचलकरंजीत उद्या रंगणार
काव्यसंध्या युवा कवीसंमेलन
इचलकरंजी : इचलकरंजीत प्रथमच ‘काव्यसंध्या २०२३’ हे निमंत्रितांचे राज्यस्तरीय युवा कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सृजन सह्याद्री फौंडेशन, दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालय, प्रतिरंग प्रॉडक्शन, लोकराजा ऊर्जामैत्री - काव्यांगण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२९) सायंकाळी पाच वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित बाळकृष्ण बुवा यांचा संगीत वारसा लाभलेल्या इचलकरंजी शहरात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या उपस्थितीत ‘काव्यसंध्या’ कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनंत राऊत (अकोला), रोहित शिंगे (इचलकरंजी), ध.सु.जाधव (हिंगोली), डॉ स्वप्निल चौधरी (सायगाव) विश्वास पाटील (राधानगरी), भैरवी चितळे (मुंबई) रमीजा जमादार (भुदरगड),अपूर्व राजपूत (सोयगाव) हे कवी सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेस प्रा. मोहन वीरकर, डॉ. डी. ए. यादव, प्रा. डॉ. डी.सी.कांबळे, रोहित शिंगे, प्रतीक साठे उपस्थित होते.