दुरंगी वृक्षास संरक्षण मिळावे ः प्रा.डॉ.बाचुळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुरंगी वृक्षास संरक्षण मिळावे ः प्रा.डॉ.बाचुळकर
दुरंगी वृक्षास संरक्षण मिळावे ः प्रा.डॉ.बाचुळकर

दुरंगी वृक्षास संरक्षण मिळावे ः प्रा.डॉ.बाचुळकर

sakal_logo
By

गगनबावडा रस्त्यावरील
दुरंगी वृक्षास संरक्षण द्या

प्रा. बाचूळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर, ता. ३१ ः कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावर गुरववाडीतर्फे शेणेवाडी गावाशेजारी एका वळणावर दुर्मिळ दुरंगी काटेसावर हा वृक्ष आहे. हा वृक्ष क्वचितच आढळून येतो, मात्र या राज्यमार्गाचे रुंदीकरण सुरू असून, यामध्ये हा दुर्मिळ वृक्ष तोडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वृक्षाला संरक्षण देण्यासाठी या मार्गात आवश्यक तो बदल करावा. तसेच या वृक्षाला संरक्षण द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ प्रा. डॉ.मधुकर बाचूळकर यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
निवेदनातील माहितीनुसार, काटेसावरीचा हा एक वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहे. या वृक्षांच्या सर्व फांद्यांना लाल फुले लागतात. एकाच फांदीला पिवळ्या रंगाची फुले लागतात. महाराष्ट्रात लाल रंगाची फुले असणारे काटेसावरीचे वृक्ष आढळतात, पण पिवळी किंवा पांढरी फुले लागणारी काटेसावरीची झाडे क्वचितच आढळतात. कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावरील हे काटेसावरीचे झाड या दुर्मिळ प्रकारातील आहे. अन्य ठिकाणी हा वृक्ष असण्याची शक्यता कमी आहे.