मालिका

मालिका

Published on

लोगो - पाणी उपसा केंद्रांची
धोक्याची घंटा : भाग १

79077
कोल्हापूर : बालिंगा उपसा केंद्रातील पंपांच्या ठिकाणची इमारतीची झालेली दुरवस्था.
79078
कोल्हापूर : नागदेववाडी केंद्राची इमारतच धोकादायक स्थितीत आहे.


लीड
कोल्हापूर शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील तीन पाणी उपसा केंद्रे जीवनदायी आहेत. त्यातही उपसापंप, वीज व्यवस्था, कुशल मनुष्यबळ या बाबी अत्यावश्‍यक आहेत. मात्र, वर्षानुवर्षे त्यांच्या सुधारणेकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिलेले नाही. अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ठोक मानधन, रोजंदारी कर्मचारीच आधार बनले आहेत. परिणामी अधूनमधून नादुरुस्ती व त्यातून खोळंबा होत असून, नदी असतानाही पाण्याची चणचण अशी शहराची अवस्था झाली आहे. या तीन केंद्रांच्या सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकणारी मालिका...


बालिंगा-नागदेववाडी केंद्रे बेभरवशाची!
केंद्रांचा आवारही असुरक्षित; ७३ वर्षांनंतरही शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी कार्यरत
उदयसिंग पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : सी, डी वॉर्ड म्हणजे शहरातील दाट लोकवस्तीचा भाग. त्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा व नागदेववाडी येथील पाणी उपसा केंद्र सध्या बेभरवशाची बनली. नागदेववाडी केंद्राचे बांधकामच कमकुवत झाले, तर बालिंगा जलशुद्धीकरण केंद्राकडून पुढे जाणाऱ्या पाईपलाईन ७३ वर्षांची झाली. त्यामुळे ही योजनाच बेभरवशाची झाली आहे. जलशुद्धीकरण केंद्राचा आवार सुरक्षित हवा; पण सध्या कुणीही या, काहीही करा असा बनला आहे. अनेक वर्षांपासून ही केंद्रे शहरवासीयांची तहान भागवत आहेत; पण देखभाल वेळच्यावेळी झालेली नसल्याचे परिस्थितीवरून दिसते.
महापालिका स्थापन होण्यापूर्वीपासून १९४९ पासून बालिंगा उपसा केंद्र सुरू आहे. त्याची भिस्त १५० अश्‍वशक्तीचे दोन जुन्या, तर ३०० अश्‍वशक्तीच्या दोन आधुनिक पंपांवर आहे. जुने पंप पर्याय म्हणून आहेत; पण त्यांचेही आयुर्मान संपले आहे. ज्यांच्या आधारावर नवीन पंप सुरू ठेवतात, तेच बिनभरवशाचे आहेत. केंव्हाही ते धोका देण्याची भीती आहे. इतक्या वर्षांनंतर बालिंगा उपसा केंद्रात दोन नवीन पंप तसेच आधुनिक इलेक्ट्रिक पॅनेल बसवले, फक्त पुरामुळे हे घडले. शुद्धीकरण केंद्रातील सेटलिंग टॅंक, फिल्टर बेडकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. परिसरात अन्य लोक बिनधास्त वावरतात. बालिंगा उपसा केंद्रापासून चंबुखडीकडे जाणारी पाईपलाईन जीर्ण झाली. तीच अवस्था इमारतीची तसेच सेटलिंग टॅंकच्या गळतीची आहे.
नागदेववाडी केंद्राची अवस्था तर फारच बिकट आहे. १९६२ मध्ये बांधलेल्या इमारतीलाच तडे गेले आहेत. जॅकवेलमधील कामाचे दगड निसटले असून चॅनेलशिवाय या दगडांमधून पाणी झिरपून आत येते. दोन्ही उपसा केंद्र व शुद्धीकरण केंद्रावर रोजचे काम सुरू ठेवण्यासाठी ठोकमानधनावर कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नजर ठेवणारी यंत्रणाच गायब आहे.
(क्रमशः)
------------
चौकट
पुराचा फटका
दोन्ही उपसा केंद्रे भोगावती नदीकाठावर असून पुराने ५३६ मीटरची पातळी गाठली की ही केंद्रे बंद पडतात. हा अनुभव घेऊन बालिंगा केंद्रात एक पर्यायी सबमर्सिबल पंप बसवला. तोच फक्त सुरू राहतो. त्यातून ४० एमएलडी पाणी दररोज मिळते. भविष्यात तसेच पूर आल्यास शहरवासीयांना केवळ हाच पंप आधार बनतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com