
मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याची सांगता
मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याची सांगता
गडहिंग्लज, ता. ३० : ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याचा सांगता कार्यक्रम झाला. यानिमित्त मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या विषयावर ग्रंथपाल समीर कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. कोणतीही भाषा शब्दांनी समृद्ध होत असते, जिचा आपल्या दैनंदिन जीवनात पुरेपूर वापर करावा तेव्हाच ती समृद्ध व संवर्धित होईल असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषण केले. डॉ. शर्मिला घाटगे यांनी प्रास्ताविक केले. गेल्या पंधरावड्यात शुद्धलेखन, मराठी स्वाक्षरी, उखाणा, मराठी भाषा, अभिवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांचे प्रोत्साहन मिळाले. क्रांती शिवणे शिवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कविता पोळ यांनी आभार मानले. प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.