जिल्हा बँक संचालक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बँक संचालक
जिल्हा बँक संचालक

जिल्हा बँक संचालक

sakal_logo
By

79369

जिल्हा बँकेत शिपाई झाले संचालक
दिलीप लोखंडे, इम्तियाज मुनशी कामगार प्रतिनिधी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) संचालक मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड झाली. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री. लोखंडे, श्री. मुनशी यांचा श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा बँकेत दोन मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना आहेत. लोखंडे हे बँक एम्प्लॉईज युनियनचे तर, इम्तियाज मुनशी हे कोल्हापूर डिस्ट्रीक्ट बँक एम्प्लॉईज युनियनचे प्रतिनिधी आहेत. यावेळी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप ऊर्फ भय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.